हरियाणामध्ये ४२ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली.(abducted) हरियाणाच्या बहादूरगड येथे सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. ही महिला नातेवाईकांसोबत प्रवास करत होती. ५ तरुणांनी या महिलेचा पाठलाग केला. या महिलेला आरोपींनी जबरदस्ती खेचत एका बंद ढाब्यामध्ये नेले आणि तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली तर एक आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला उत्तर प्रदेशमध्ये राहणारी आहे. ती नोकरीच्या शोधात मामासोबत बहादुरगड येथे आली होती. १२ जानेवारीच्या मध्यरात्री ती मामासोबत दिल्ली मेट्रोच्या ग्रीन लाईनजवळील पंडित श्रीराम शर्मा मेट्रो स्टेशनजवळ उतरली होती. त्या ठिकाणी तिचा नातेवाईक त्यांना न्यायला आला. त्यावेळी त्यांनी पाहिले की, ५ जण त्यांचा पाठलाग करत आहे.

मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास आरोपींनी त्या तिघांना अडवले. (abducted) आरोपींनी महिला आणि तिच्या नातेवाईला घाबरवत धमकी दिली. त्यानंतर त्यांनी महिलेचे अपरहण केले. महिलेला खेचत त्यांनी दिल्ली रोहतक रोडवर मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या एका बंद ढाब्यात नेले. त्याच ठिकाणी महिलेवर आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित महिला आणि तिच्या नातेवाईकाने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले.(abducted) त्यांतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. त्यामध्ये आरोपी कैद झाले होते. आरोपी या घटनेपूर्वी एका दारूच्या दुकानात गेले होते. त्याठिकाणी त्यांनी दारू खरेदी केली होती. त्यासाठी त्यांनी १०० रुपयांच्या नोटा आणि ३० रुपये यूपीआयद्वारे दिले होते. याच डिजिटल पेमेंटद्वारे पोलिस आरोपींपर्यंत पोहचले. पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्ये आरोपींना बेड्या ठोकल्या. ४ आरोपींना पोलिसांनी अटक केली असून ५ वा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
हेही वाचा :