लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे.(December) मकरसंक्रांतीच्या दिवशी महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. दरम्यान, यामध्येदेखील अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत आणि काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. यामागचे कारण म्हणजे केवायसी, असं सांगितलं जात आहे. मात्र, अनेक महिलांनी केवायसी करुनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.

लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते.(December) केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर निश्चित केली होती. तोपर्यंत ज्या महिलांनी केवायसी केले त्यांचाचा लाभ अखंडितपणे सुरु राहिल, असं सांगितलं होतं. दरम्यान, नवीन आर्थिक वर्षापासून केवायसी न केलेल्या महिलांना पैसे मिळणार नाही, असं सांगितलं होतं. मात्र, आतापासूनच महिलांच्या खात्यात पैसे येणे बंद झाले आहे.
लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थ्यांनी केवायसी केली असूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. यामागचे कारण म्हणजे निकषात न बसणाऱ्या लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत. (December) केवायसी केल्यानंतर महिलांबाबत सर्व माहिती मिळते. महिलांच्या वडिलांची किंवा पतीची केवायसी केल्यामुळे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न कळते. दरम्यान, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जर २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाडकी बहीण योजनेत डिसेंबरचा हप्ता उशिरा जमा झाला.(December) त्यानंतर आता जानेवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न विचारला जात आहे. हा हप्तादेखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. झेडपी निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
आता व्हॉट्सअॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स
Windows 10 आणि 11 युजर्सना अलर्ट, CERT-In चा इशारा, जाणून घ्या
यंदाच्या बजेटमधून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट, जनधन खातेधारकांसाठी महत्त्वाचा बदल होणार?