जिल्हा परिषदेच्या मागील सभागृहात भाजप, आवाडे आणि महाडिक गट (strength) मिळून १९ जागा होत्या. मात्र, आता जिल्ह्यात भाजपचे दोन व एक सहयोगी आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील भाजपचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांनी जिल्ह्यातील ४० जागांवर आपला दावा सांगितला आहे.आज झालेल्या भाजपच्या बैठकीत ही मागणी मांडण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीमध्ये सुरुवातीला प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधींनी स्थानिक ठिकाणी असणारी राजकीय परिस्थिती मांडून जागांची मागणी केली. गेल्या वेळच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडून आलेले १४ सदस्य होते.

माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीतून तीन सदस्य निवडून आले. माजी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या ताराराणी आघाडीतून आलेले दोन सदस्य सभागृहात होते.(strength) आता या दोन्ही आघाड्या भाजपसोबत असल्याने गेल्या सभागृहातील १९ जागांवर भाजपचा प्रबळ दावा आहे.तसेच आता चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजी पाटील यांनी तालुक्यातील चार जागा ‘कमळ’ चिन्हावर लढवणार असल्याचे सांगितले. दक्षिण विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या पाच जागा आहेत.
याशिवाय अन्य तालुक्यांमध्येही त्यांनी आपला दावा सांगितला आहे. महायुतीमधील नेत्यांशी चर्चा करूनच याबाबतचा निर्णय करू, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भरमूअण्णा पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, संजय घाटगे, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर,(strength) जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या मागील सभागृहात भाजप, आवाडे आणि महाडिक गट मिळून १९ जागा होत्या. मात्र, आता जिल्ह्यात भाजपचे दोन व एक सहयोगी आमदार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांतील भाजपचे कार्यकर्ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे भाजप नेत्यांनी जिल्ह्यातील ४० जागांवर आपला दावा सांगितला आहे.
आज झालेल्या भाजपच्या बैठकीत ही मागणी मांडण्यात आली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. बैठकीमध्ये सुरुवातीला प्रत्येक तालुक्यातील प्रतिनिधींनी स्थानिक ठिकाणी असणारी राजकीय परिस्थिती मांडून जागांची मागणी केली. गेल्या वेळच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या ‘कमळ’ चिन्हावर निवडून आलेले १४ सदस्य होते.माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताराराणी आघाडीतून तीन सदस्य निवडून आले. माजी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या ताराराणी आघाडीतून आलेले दोन सदस्य सभागृहात होते. आता या दोन्ही आघाड्या भाजपसोबत असल्याने गेल्या सभागृहातील १९ जागांवर भाजपचा प्रबळ दावा आहे.
तसेच आता चंदगड विधानसभेचे आमदार शिवाजी पाटील यांनी तालुक्यातील चार जागा ‘कमळ’ चिन्हावर लढवणार असल्याचे सांगितले. दक्षिण विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या पाच जागा आहेत.याशिवाय अन्य तालुक्यांमध्येही त्यांनी आपला दावा सांगितला आहे. महायुतीमधील नेत्यांशी चर्चा करूनच याबाबतचा निर्णय करू, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ४ बैठकीला खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, शिवाजी पाटील, राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे,भरमूअण्णा पाटील, माजी आमदार सुरेश हाळवणकर, संजय घाटगे, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शौमिका महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव यांच्यासह प्रत्येक तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
चंदगड ४
भुदरगड १
कागल ३
करवीर २
शाहूवाडी १
गगनबावडा १
हेही वाचा :
आता व्हॉट्सअॅपवरही मिळणार आधार कार्ड, झटपट डाउनलोड करण्याच्या सोप्या स्टेप्स
Windows 10 आणि 11 युजर्सना अलर्ट, CERT-In चा इशारा, जाणून घ्या
यंदाच्या बजेटमधून महिलांना मिळणार मोठं गिफ्ट, जनधन खातेधारकांसाठी महत्त्वाचा बदल होणार?