गोरगरीब मराठ्यांच्या प्रश्नांसाठी सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार”, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमधून घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. मुंबईमधील आझाद मैदान येथे मराठा(Maratha) समाजाला आरक्षण देण्यासाठी पाच दिवस केलेल्या उपोषणानंतर सरकारने आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडत आंदोलन मागे घेतलं आणि रात्रीच ते छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले. आज पत्रकरपरिषद घेऊन त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळेस त्यांनी जरांगेंनी मराठ्यांना आणि कुणबींना एकच ठरवून समाजाचं वाटोळं केलं म्हणणाऱ्यांनाही उत्तर दिलं.

“माझ्या गरीब मराठ्यांनी जीवाची बाजी लावून ही बाजी जिंकली. अनेक शतकापासून या लढायला यश मराठ्यांच्या पदरात पडलं. सरकारने काढलेल्या तिन्हीही जीआरचे श्रेय समाजाला जाते. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळे मराठे आरक्षणात जाणार. कुणीही शंका बाळगू नये,” असा विश्वास जरांगेंनी व्यक्त केला. “75-76 वर्षात मराठ्यांच्या हिताची एक ओळही सरकारने लिहिली नाही. शांत डोक्याने विचार करावा.
निर्णय घेताना मी आणि समाज दोघे निर्णय घेतो,” असंही जरांगे म्हणाले.”मराठवाडयातील एकहीजण मराठा आरक्षणापासून दूर राहणार नाही. सरकारच्या बाजूने बोलणाऱ्याच्या टोळ्या अजून वाढणार आहे. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी गावपातळीवर समिती असणार आहे. तिघांची ही समिती असेल. ज्यांच्याकडे जमीन नाही पण बटाईने केली आहे त्यांना हमीपत्र देता येईल,” असं जरांगे म्हणाले.
“हैद्राबाद गॅझेटच्या नोंदी लक्षात घेऊन कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबतचा हा जीआर आहे. समाजाचं मी का वाटोळे करीन? कुणी बोलला काय आणि नाही बोलला काय? मला काही फरक पडत नाही. अशा लोकांना मला आणि समाजाला एकमेकांपासून संपवायचं आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील मराठे ओबीसीत गेले तर या लोकांना काहीही मिळणार नाही. या लोकांचे मस्तक आणि मन कधीही आपल्या बाजूने राहिले नाही. हे लोक फक्त सरकारच्या बाजूने बोलतात.

मला मराठा (Maratha)समाजाचे वाटोळे करायचे असते तर 58 लाख कुणबी नोंदीसह इतर प्रश्न सोडवले नसते. माझ्यावरचा विश्वास समाजाने ढवळू देऊ नये,” असं आवाहन जरांगेंनी केलं. “शिंदे समिती गठीत केली तेव्हा हे लोक असेच म्हणाले पण नोंदी सापडल्या आणि यांचे तोंड बंद झाले. शिंदे समितीने गॅझेटचा अहवाल तयार करून सरकारला दिला आणि त्यांना जीआर काढायला भाग पाडले,” असं जरांगे हैदराबाद गॅझेटसंदर्भात म्हणाले.
“सरकारने काढलेल्या जीआरमध्ये काही शब्दांची कमी असेल तर मंत्रीमंडळ नवीन शब्द टाकण्यास तयार आहे. हैद्राबाद गॅझेटसाठी जीआर काढला आहे. एक महिन्याच्या आत केसेस मागे घेतल्या जाणार आहे. वाटोळे करणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. आतापर्यंत एक ओळ सुद्धा मराठवाड्याच्या बाजूने लिहिलेली नव्हती पण आता आरक्षण मिळणार आहे,” असं जरांगे म्हणाले.
जरांगे यांनी मराठा आणि कुणबी समाजाला एकच ठरवून वाटोळे केल्याचा आरोप करणाऱ्यांना उत्तर देताना सांगितले की, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठे आरक्षणात समाविष्ट होणार आहेत. त्यांनी समाजाचा विश्वास ढवळू नये असे आवाहन केले.जरांगे यांनी मराठा समाजाच्या लढ्याला आणि त्यांच्या जीवावर बाजी लावणाऱ्या प्रयत्नांना यशाचे श्रेय दिले. तसेच, शिंदे समितीने गॅझेटचा अहवाल तयार करून सरकारला जीआर काढण्यास भाग पाडल्याचे सांगितले.ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत, त्यांच्यासाठी गावपातळीवर तीन सदस्यांची समिती स्थापन केली जाईल. ज्यांच्याकडे जमीन नाही, परंतु बटाईने शेती केली आहे, त्यांना हमीपत्र देण्याची व्यवस्था असेल.
हेही वाचा :
4 मुलांची आई 26 वर्षीय मुलाच्या प्रेमात झाली वेडी , असा झाला शेवट…
शिवभोजन थाळीही बंद होण्याच्या मार्गावर….
कोल्हापुर: प्रेमविवाह केला म्हणून सेवानिवृत्त सैनिकाने बहिणीच्या नवऱ्यावर झाडली गोळी