राज्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा आरक्षणासाठी (reservation)मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक आंदोलन केले. आझाद मैदानावर त्यांनी हजारो समर्थकांसह उपोषण केले. यानंतर सरकारने जरांगे पाटील यांच्या आठपैकी सहा मागण्या पूर्ण केल्या. यामुळे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारच्या आदेशाविरोधात त्यांनी कोर्टामध्ये जाण्याची तयारी देखील दाखवली आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीला देखील छगन भुजबळ यांची अनुपस्थिती असल्याने चर्चांना उधाण आले. यावरुन आता खासदार राऊत यांनी छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण(reservation) आणि ओबीसी आरक्षणावरुन सुरु असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. खासदार राऊत म्हणाले की, “मराठा-ओबीसी संघर्ष वाढले असे आपल्याला वाटत नाही. संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकार मधील काही घटक आजही करत आहेत. सरकारमधील काही सहकाऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेऊच नाही आणि सरकार अडचणीत यावं असं वाटतं होतं. महायुती ही तीन चाकाची रिक्षाच आहे. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांना दूर ठेवण्यात आलं. शिंदे यांनीच मराठा आंदोलकांना रसद पुरवल्याचा आरोप राऊतांनी केला. तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
खासदार राऊत म्हणाले की, “भुजबळ हे नाराज आहेत की नाही, यापेक्षा ते मंत्रिमंडळात समाधानी आहेत, असे दिसते. भुजबळ हे नाराज असतील तर ते राजीनामा देतील का? जर एखाद्या समाजावर अन्याय झाला आणि आपण त्या समाजाचे नेतृत्व करतो तर ते राजीनामा देणार आहेत का? त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे. महाराष्ट्राच्या प्रश्नावर तत्कालीन अर्थमंत्री सीडी देशमुख यांचे नेहरूंशी मतभेद झाल्यावर त्यांनी तात्काळ राजीनामा दिला होता. तुमच्या समाजावर अन्याय झाला आहे आणि अन्याय करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करत आहात. मग भुजबळांनी राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी खासदार राऊत यांनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, “अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने भुजबळांना मंत्रिमंडळात जागा दिली नव्हती. पण ओबीसींचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना मंत्रिमंडळात जागा दिली. महाराष्ट्र जाती-पातीत कधीच इतका वाटला गेला नव्हता. गेल्या 10 वर्षात या देशात जाती-पोटजातीचे राजकारण सुरू आहे. मराठी माणसांच्या एकजुटीला फोडण्यासाठी पक्ष फोडले. तसाच हा प्रकार आहे. आता जातींच्या उपसमित्या तयार करून हाच मार्ग अवलंबल्या जात असल्याचा आरोप राऊतांनी केला.
हेही वाचा :
संत बाळूमामा देवालयातील व्हीआयपी दर्शन बंद….
फोटो लगेच हटवा नाहीतर पब्लिकली कॉल-आऊट करेन सोनाक्षी सिन्हा….
महिलेला जबरदस्ती बाथरूममध्ये नेले,मारहाणही केली… बलात्कारी अभिनेत्याला अटक