कोल्हापूर : गोरगरिबांना परवडणाऱ्या दरात जेवण देणारी ‘शिवभोजन थाळी’(Thali) योजना गंभीर आर्थिक संकटात सापडली आहे. मागील चार महिन्यांपासून शासनाकडून अनुदान न मिळाल्यामुळे अनेक केंद्र चालक अडचणीत आले आहेत. यामुळे योजना बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

फक्त दहा रुपयांत मिळणारी शिवभोजन थाळी(Thali) ही गोरगरिबांसाठी दिलासा देणारी ठरली होती. शहरी भागातील केंद्रांना प्रति थाळी ५० रुपये आणि ग्रामीण भागातील केंद्रांना ३५ रुपये अनुदान शासन देत असते. मात्र, एप्रिलपासून आजपर्यंत एकही हप्ता वितरित झालेला नसल्याने केंद्र चालवणे अवघड झाले आहे.
केंद्र चालकांचा सवाल आहे की, “अनुदानच मिळाले नाही तर आम्ही हा उपक्रम कसा सुरू ठेवणार?” काहींनी तर आर्थिक तुटवड्यामुळे केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

गेल्या वर्षभरापासून ही समस्या कायम असून, सुरुवातीला महिन्याभराचे अनुदान थकले, नंतर ते दोन महिन्यांपर्यंत वाढले आणि आता सलग चार महिने अनुदान न मिळाल्याने असंतोष पसरला आहे. राज्य शासनाने योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले असले तरी वेळेत निधी न मिळाल्याने शिवभोजन थाळीची गाडी अडखळली आहे.
हेही वाचा :
१७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा….
प्रसिद्ध शास्त्रीय गायकाचा घटस्फोट, 17 वर्षाचा संसार मोडला
साखर खाल्ल्यामुळे केस लवकर पांढरे होतात का?