काठमांडू : डिजिटल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे सोशल मीडिया आज माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सकाळी उठताच आणि रात्री झोपण्यापूर्वी लोक सोशल मीडिया(social media) साईट्स वापरतात. भारतासह जगभरात सोशल मीडियाचा विस्तार झाला असून गावखेड्यांमध्येही हा दैनंदिन जीवनाचा भाग बनला आहे.

मात्र, भारताचा शेजारील देश नेपाळ ने काही मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळमध्ये फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X (पूर्वीचे ट्विटर) या साईट्सवर तात्काळ बंदी लागू करण्यात आली आहे.

बंदी मागे कारण

नेपाळच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने संबंधित कंपन्यांना 28 ऑगस्टपासून 7 दिवसांचा कालावधी देऊन नोंदणी करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, या कंपन्यांनी नेपाळ सरकारकडे आवश्यक नोंदणी पूर्ण केली नाही. त्यानुसार तात्काळ प्रभावाने बंदी लागू करण्यात आली.

इतर प्लॅटफॉर्म्सची स्थिती

देशात आधीच टीकटॉक, व्हीटॉक, वायबर आणि निंबज यांसारख्या सोशल मीडिया(social media) प्लॅटफॉर्मची नोंदणी झाली आहे. तर, टेलिग्राम आणि ग्लोबल डायरी नोंदणी प्रक्रियेत आहेत. मात्र फेसबुक (मेटा, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप), युट्यूब, ट्विटर आणि लिंक्डइनने नोंदणी न केल्याने या प्लॅटफॉर्मवर बंदी आली आहे.नेपाळ सरकारने स्पष्ट केले आहे की संबंधित कंपन्यांनी नियम व अटी पूर्ण केल्यानंतर हे प्लॅटफॉर्म पुन्हा सुरू करण्यास परवानगी मिळेल.

हेही वाचा :

खडकावर बसून रडताना दिसली खरीखुरी जलपरी…..Video Viral

पती बाजारातून समोसे आणायला विसरला म्हणून पत्नीकडून बेदम मारहाण

8 सप्टेंबरला शाळांनाही सुट्टी? शिक्षण उपसंचालकांनी केलं जाहीर, पण…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *