श्रीलंकेतील उवा प्रांतातील बदुल्ला जिल्ह्यात गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघाताने हाहाकार माजला आहे. पर्यटकांची बस तब्बल १००० फूट दरीत कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण श्रीलंकेतील टांगाले शहरातून पर्यटकांचा गट सहलीसाठी एला शहराकडे जात होता. रात्री सुमारे ९ वाजताच्या सुमारास बस(bus) एका तीव्र वळणावर समोरून आलेल्या जीपला धडकली. या धडकेनंतर बसने रस्त्याची रेलिंग तोडली आणि ती थेट खोल दरीत कोसळली.

अपघातानंतर स्थानिक रहिवासी, पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन दलाने बचावकार्य सुरू केले. १५ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी आहेत. जखमींवर बदुल्ला शिक्षण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. डॉक्टरांची विशेष टीम सतत लक्ष ठेवून आहे.या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे(bus).
हेही वाचा :
तब्येत बिघडल्याच्या बहाण्याने हॉटेलवर नेलं नंतर….
लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधी मिळणार.. उपमुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली तारीख
घरबसल्या दरमहा मिळतील हजारो रुपये, या योजना जाणून घ्या