राज्य सरकारने 5 सप्टेंबरला असणारी ईद-ए-मिलादची शुक्रवारची सुट्टी (Holiday)रद्द केली आहे. त्याऐवजी ही सुट्टी सोमवारी 8 सप्टेंबरला दिली जाणार आहे. राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय जाहीर केला असून तसं पत्रक काढलं आहे. गणपती विसर्जनामुळे मुस्लिम समुदायाने हिंदू-मुस्लीम एकोप्याच्या दुष्टीने शुक्रवारऐवजी सोमवारी 8 सप्टेंबर 2025 रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्य सरकारने शुक्रवारी सोमवारी सुट्टी जाहीर केली. हा निर्णय फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालकांनी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने 5 सप्टेंबरऐवजी 8 सप्टेंबरला शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. तर पालिकेच्या शिक्षण विभागाने 5 व 8 सप्टेंबर दोन्ही दिवशी सुट्टी देण्याचा निर्णय घेतला. पण यामुळे गोंधळ वाढला आणि त्यात खासगी शाळांनी भर टाकत उपसंचालकांच्या आदेशानुसार 8 सप्टेंबरला सुट्टी दिली आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम समुदायाने 8 ऐवजी 8 सप्टेंबरला जुलूस काढण्याचं ठरवलं. त्यानंतर राज्य सरकारने 8 सप्टेंबरला मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी(Holiday) जाहीर केली. मात्र शिक्षण उपसंचालकांनी 5 सप्टेंबर रोजी खासगी शाळा सुरु राहतील आणि 8 सप्टेंबरला बंद राहतील असा आदेश जारी केली.मात्र 5 सप्टेंबरला काही खासगी शाळांनी पूर्वनियोजित सुट्टी जाहीर केली असल्याने शिक्षक आणि पालकांमध्य संभ्रम उडाला.
राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्ट्यांपैकी ई-ए-मिलादची सुट्टी शुक्रवार दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी दर्शवली आहे. मुस्लिमांचा धार्मिक सण ई-ए-मिलाद हा मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणात साजरा करतो. यानिमित्ताने जुलूस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.शनिवारी 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदू सण असल्याने राज्यात बंधुता आणि हिंदू-मुस्लिम ऐक्य राखण्यासाठी 21 ऑगस्ट 2025 रोजी विविध मुस्लिम संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत मुस्लिम समुदायाने सोमवारी 8 सप्टेंबर 2025 रोजी मिरवणुकीचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार दिनांक 8 मे 1968 च्या उक्त अधिसूचनेद्वारे केंद्र सरकारला देण्यात आलेल्या परक्राम्य संलेख अधिनियम 1881 च्या कलम 25 अंतर्गत दिलेल्या अधिकारांचा वापर करुन मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी 5 सप्टेंबर 2025 ऐवजी सोमवारी 8 सप्टेंबर 2025 हा दिवस सार्वजनिक सुट्टी म्हणून जाहीर करण्यात येत आहे. आणि मुंबई शहर, मुंबई उपनगर जिव्ह्यांव्यतिरिक्त इतर जिल्ह्यांसाठी शुक्रवारी 5 सप्टेंबर 2025 ही सार्वजनिक सुट्टीची तारीख कायम ठेवण्यात येत आहे.
5 सप्टेंबरची सुट्टी 8 सप्टेंबरले देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे करण्यात आली होती. ‘ईद -ए-मिलादुन नबी’चे जुलूस 8 सप्टेंबर रोजी काढण्यात येणार असल्याने या दिवशी राज्य शासनाने शासकीय सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ‘भिवंडी पूर्व’चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी राज्यभर श्रीगणेश विसर्जन आहे. मात्र त्याच्या एक दिवस आधी म्हणजेच 5 सप्टेंबर रोजी म्हणजेच शुक्रवारी मुस्लीम समाजासाठी पवित्र असलेला ‘मोहम्मद पैगंबर’ यांचा जन्मदिवस आहे. या दिवशी जुलूस काढला जातो. या शोभायात्रेला ‘ईद -ए-मिलादुन नबी’चा जुलूस असं म्हणतात. मात्र हिंदू-मुस्लीम एकोप्याच्या दुष्टीने अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी हा जुलूस काढण्याऐवजी हा जुलूस सोमवारी काढला जाणार आहे. त्यामुळेच सोमवारी सुट्टी जाहीर करण्याची मागणी करण्यात आली होती.
ईद-ए-मिलाद, ज्याला मिलाद-उन-नबी किंवा मौलिद असेही म्हणतात, हा इस्लाम धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. हा सण प्रेषित हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा दिवस इस्लामिक कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्यातील रबी अल-अव्वल च्या १२व्या तारखेला येतो.२०२५ मध्ये रबी अल-अव्वल महिन्याचा चंद्र दिसण्यावर आधारित, ईद-ए-मिलाद ५ किंवा ६ सप्टेंबर २०२५ रोजी साजरी होईल. भारतात, मार्कझी रुएत-ए-हिलाल समिती आणि मजलिस-ए-उलमा-ए-दक्कन यांनी २४ ऑगस्ट २०२५ रोजी चंद्र दिसल्याचे जाहीर केले, त्यामुळे सण ५ सप्टेंबर २०२५ रोजी साजरा होईल. परंतु मुंबईत गणेश विसर्जनामुळे मिरवणूक ८ सप्टेंबर २०२५ रोजी होईल.
हा सण प्रेषित मोहम्मद यांच्या जन्मदिवसाचे स्मरण आणि त्यांच्या शिकवणींचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. त्यांनी इस्लाम धर्माचा प्रचार केला आणि कुराण हा पवित्र ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. हा दिवस दया, एकता, आणि मानवतेच्या मूल्यांचा उत्सव आहे.
हेही वाचा :
Kolhapur : बोलता बोलता वाद झाला… आणि त्याने गळा चिरला!
मुलगी गाडीसह हवेत उडाली अन् थेट जमिनीवरच आदळली Video Viral
पाण्याच्या बाटलीचं झाकण फक्त रंग नाही, आरोग्याचं गुपित सांगतं!