लाडकी बहिण योजना (Yojana)अंतर्गत आता महिलांना दरमहा 2100 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती देत सरकारने दिलेले आश्वासन लवकरच पूर्ण होईल असे स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी साम टीव्हीच्या मुख्यालयात गणेश दर्शन घेतल्यानंतर “ब्लॅक अँड व्हाईट” या विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर संवाद साधताना लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले.
महायुती सरकारने सत्ता आल्यानंतर महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा होऊ लागले होते. विधानसभा निवडणुकीच्या घोषणापत्रात हप्ता 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती.
शिंदे म्हणाले, “आम्ही जे आश्वासन दिले आहे ते नक्कीच पूर्ण करू. लाडकी बहिण योजनेचा(Yojana) वाढीव लाभ लवकरच महिलांना मिळणार आहे.”त्यामुळे राज्यातील लाखो लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच जादा रक्कम जमा होणार असून, या घोषणेमुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
हेही वाचा :
‘या’ मंत्र्याने नातवासाठी खरेदी केली देशातील पहिली टेस्ला कार!
कोल्हापुरात आईच्या मांडीवरच दहा वर्षांच्या बालकाने सोडला प्राण..
34 गाड्यांमध्ये बॉम्ब… बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी