अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना मोठी आव्हानात्मक जबाबदारी मिळाली आहे. उद्या (६ सप्टेंबर) लाखो मुंबईकर रस्त्यावर उतरून गणेश विसर्जनाच्या मिरवणुका पाहणार आहेत. मात्र, याआधीच पोलिसांना बॉम्बस्फोटाची(Bombs) गंभीर धमकी देणारा मेसेज प्राप्त झाला आहे.

हा मेसेज थेट वाहतूक पोलिसांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर आला आहे. यात म्हटलं आहे की, ३४ गाड्यांमध्ये बॉम्ब(Bombs) ठेवण्यात आला असून, तब्बल ४०० किलो आरडीएक्सचा साठा तयार करण्यात आला आहे. या स्फोटांमध्ये १ कोटी लोक मृत्युमुखी पडतील असा दावा धमकीत केला आहे. यामागे ‘लष्कर-ए-जिहादी’ या संघटनेचा हात असल्याचा उल्लेख असून, १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसल्याचा दावाही करण्यात आला आहे.
या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे. आधीपासूनच गणेशोत्सव काळात पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त ठेवला जातो. पण या धमकीनंतर संपूर्ण मुंबईत अलर्ट मोड जाहीर करण्यात आला आहे. पोलिस दलासोबतच विशेष सुरक्षा यंत्रणादेखील गुप्त तपासणी करत आहेत.

अनंत चतुर्दशीला मुंबईतील दोन ठिकाणी सर्वाधिक गर्दी होणार आहे.परळ लालबाग परिसर लालबागचा राजा, मुंबईचा राजा (गणेश गल्ली), परळचा राजा (नरेपार्क), परळचा महाराजा आणि परळचा लंबोदर (लक्ष्मी कॉटेज) या मोठ्या मंडळांचे विसर्जन होणार आहे.
गिरगाव चौपाटी विसर्जनाची प्रमुख ठिकाणे असल्याने लाखो गणेशभक्त येथे दाखल होणार आहेत.यावेळी पोलिसांना प्रत्येक ठिकाणी काटेकोर सुरक्षा करावी लागणार आहे.लालबागचा राजा नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू असतोच, मात्र यंदा परळचा महाराजा आणि परळचा लंबोदर (लक्ष्मी कॉटेज) या मंडळांच्या गणेशमूर्तींचीही विशेष चर्चा आहे. लक्ष्मी कॉटेज मंडळाने यावर्षी गणरायाची ज्योतिबा रुपातील भव्य मूर्ती साकारली आहे, ज्यामुळे भाविकांमध्ये उत्सुकता आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी…आता शेती खर्च होईल कमी
राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर गुन्हा, शिक्षिकेवर लैंगिक अत्याचार
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि X वर बंदी; नेमकं कारण काय?