जगभरातील टेकप्रेमींना ज्याची आतुरतेने वाट आहे, तो ॲपलचा वार्षिक “Awe Dropping” इव्हेंट उद्या (९ सप्टेंबर) भारतीय वेळेनुसार रात्री १०.३० वाजता रंगणार आहे. या भव्य कार्यक्रमात कंपनी आपली नवी iPhone 17 सीरिज सादर(launching)करणार आहे. यावेळी फोनमध्ये आणखी स्लिम डिझाइन, एआयवर आधारित नवे फीचर्स आणि अधिक ऍडव्हान्स कॅमेरा सिस्टीम असण्याची चर्चा आहे. यासोबतच नवीन Apple Watch, AirPods Pro 3 आणि काही हार्डवेअर अपडेट्सही जाहीर होऊ शकतात.

भारतीय बाजारासाठी बेस मॉडेलची किंमत महत्वाची :
भारतातील ग्राहकांचे लक्ष प्रामुख्याने किंमतीवर खिळले आहे. अहवालानुसार, iPhone 17 च्या बेस मॉडेलची किंमत साधारण ₹८६,००० असू शकते. गेल्या वर्षीचा iPhone 16 बेस मॉडेल ₹७९,९०० ला उपलब्ध होता. म्हणजेच सुमारे ₹६,००० ने किंमत जास्त होण्याची शक्यता आहे.
iPhone 17 Launch | iPhone किंमतींचा प्रवास :
2008 : iPhone 3G – ₹३१,०००
2010 : iPhone 4 – ₹३४,५००
2012 : iPhone 5 – ₹४५,५००
2014 : iPhone 6 – ₹५३,५००
2016 : iPhone 7 – ₹६०,०००
2017 : iPhone 8 – ₹६४,०००
2017 : iPhone X – ₹८९,०००
2020–2024 : iPhone 12 ते 16 – ₹७९,९००
2025 अंदाज : iPhone 17 – ₹८६,०००
भारतात उत्पादन, तरीही किंमत वाढ :
ॲपलने भारतात iPhone 17 चे असेंब्ली उत्पादन सुरू केले असले तरी, प्रोसेसर, कॅमेरे आणि डिस्प्ले यांसारखे महत्त्वाचे पार्ट्स आयात करावे लागतात. त्यामुळे परकीय चलनातील बदलांचा परिणाम अंतिम किंमतीवर होणारच. स्थानिक उत्पादनामुळे सप्लाय चेन सुधारेल, पण ग्राहकांना किंमतीत मोठा दिलासा मिळणे कठीण दिसते.
मिळालेल्या माहितीनुसार, 2025 मध्ये भारतात ॲपलचे शिपमेंट १.५ कोटी युनिट्स पर्यंत जाऊ शकते(launching). यामुळे भारतीय स्मार्टफोन बाजारात ॲपलचा हिस्सा १२-१५% पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, जो दशकभरापूर्वी केवळ १-१.५% होता. आता ग्राहकांचे लक्ष उद्याच्या इव्हेंटकडे लागले आहे. ॲपल iPhone 17 बेस मॉडेलसाठी खरोखरच ₹८६,००० किंमत जाहीर करते का, की भारतीय ग्राहकांसाठी वेगळी रणनीती आणते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
हेही वाचा :
DJ चा धुमाकूळ, मनस्ताप अन्…; विसर्जन मिरवणुकीदरम्यान नको तेच घडलं
राज्यातील ‘या’ भागाला मुसळधार पावसाचा इशारा, पुढील ४८ तास रेड अलर्ट
मनोज जरांगे पाटलांची फडणवीस सरकारला नवी डेडलाईन