भाजप खासदार मुकेश राजपूत यांच्या बहिणी रीना सिंग यांनी आपल्या सासरच्या लोकांवर गंभीर आरोप (crime)केले आहेत. कासगंज जिल्ह्यातील सहावर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत त्यांनी सांगितले की, सासरे लक्ष्मण सिंग, दीर राजेश आणि गिरीश यांनी त्यांच्यावर मारहाण केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

रीना सिंग यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, त्या आंघोळ करत असताना त्यांचा दीर गिरीश आणि सासरे लक्ष्मण सिंग यांनी खिडकीतून त्यांचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला. याला विरोध केला असता त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली. तक्रारीनुसार, लक्ष्मण सिंग यांनी परवानाधारक रायफल काढून “गोळी घालीन” अशी धमकी दिली आणि काठीने मारहाण केली.

याशिवाय, दीर राजेशने धारदार चाकूने हल्ला(crime) करून त्यांच्या हाताला जखम केली, तर गिरीशने लोखंडी रॉडने वार केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला असून त्यात लक्ष्मण सिंग काठीने हल्ला करताना दिसत आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, लक्ष्मण सिंग, राजेश आणि गिरीश यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. चौकशी सुरू असून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

प्रतीक्षा संपली! उद्या लाँच होतोय iPhone 17

मनोज जरांगे पाटलांची फडणवीस सरकारला नवी डेडलाईन

PSI मध्ये मुलींमध्ये पहिली, IAS होण्याचं स्वप्न पण आयुष्याची झुंज हरली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *