सांगली – अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून एका तरुणाचा खून(murder) झाला आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील अंकली गावात घडली. मृतक तरुणाचे नाव शीतल पाटील (वय २५) असून, त्याच्यावर तिघांनी चाकू हल्ला केला होता.

घटनेनंतर शीतल पाटील याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी स्मशानभूमीत मृतदेह संशयित आरोपींच्या घरासमोर आणून आंदोलन सुरू केले, ज्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांनी संशयितांविरोधात कडक कारवाई होण्याची मागणी करत अंत्यविधीसाठी विरोध केला.
गावातील तणाव पाहता पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सांगली ग्रामीण पोलीस यांनी तिघांना अटक(murder) केली असून, त्यांच्यावर कडक कारवाई होईल अशी हमी ग्रामस्थांना दिल्यामुळे तणाव निवळला. तथापि, गावात अजूनही गाव बंद असून, खुनाच्या घटनेचा निषेध नोंदवण्यात येत आहे. मोठा पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा :
‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवालचा अपघाती मृत्यू? सोशल मीडियावर चाहत्यांकडून श्रद्धांजली
चॅम्पियन खेळाडूची प्रेयसीने केली निर्घृण हत्या, क्रीडा जगताला धक्का
कोल्हापूर-सांगली राज्यमार्गावर अपघात; भरधाव कारची रिक्षाला जोरदार धडक