भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार(political retirement)गटाचे आमदार रोहित पवार यांना आव्हान दिलं आहे. रोहित पवार जी, अन्यथा, राजकीय संन्यास घ्या. असं आव्हान बावनकुळेंनी दिलं आहे. बावनकुळे रोहित पवारांना असं का म्हणाले? हे प्रकरणं नेमकं काय? जाणून घेऊ…

नेमकं प्रकरणं काय?
नुकतच राज्यामध्ये मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांच्या लढ्याला यश आलं आहे. कारण जरांगेंच्या मुंबईतील उपोषणाची दखल घेत राज्यातील फडणवीस सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर जारी केला आहे. त्यानंतर भाजप आणि सरकारकडून या यशाचं श्रेय फडणवीसांना दिलं जात आहे. त्यासाठी राज्यभर जाहिराती दिल्या जात आहेत. त्यातच एक निनावी लावलेली जाहिरात चर्चेंचा विषय ठरला आहे.
ही जाहिरात निनावी का लावली गेली? या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? असा सवाल विरोधक आणि रोहित पवारांनी केला आहे.
काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?
रोहित पवारांच्या(political retirement) आरोपांना उत्तर देण्यासाठी बावनकुळेंनी (Chandrashekhar Bawankule) ट्विट केलं आहे. ते म्हणाले की, रोहित पवार जी, फारच मोठ्ठा शोध लावला तुम्ही! महसूलमंत्री म्हणून मी कोणत्या कंपनीला 90 कोटींचा दंड माफ केला, हा आरोप सिद्ध करा. अन्यथा, राजकीय संन्यास घ्या. करा सिद्ध!
बावनकुळे साहेब, तुम्ही रोज ४० कोटी ऐवजी ४०० किंवा ४००० कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल. या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर एकीकडं पैसे नाहीत म्हणून योजना बंद केल्या जात असताना, बिले पेंडिंग राहिल्याने कंत्राटदार आत्महत्या करत असताना जाहिराती छापणे म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी नाही का?

या जाहिराती भाजपने दिल्या असतील तर भाजपने आपल्या नावाने जाहिरात का दिली नाही? भाजपने दिली नाही तर मग एखाद्या कंपनीने किंवा मित्रपक्षाच्या अडचणीत सापडलेल्या नेत्याने उपकाराची परतफेड म्हणून या कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या का? उदा. तुम्ही महसूलमंत्री म्हणून ज्या कंपनीचा ९० कोटी रुपयांहून अधिक कोटींचा दंड माफ केला होता, त्या कंपनींने जाहिरात दिली का? या जाहिरातीच्या प्रकरणात काहीही काळेबेरं किंवा लपवण्यासारखं नसेल तर एवढे कोट्यवधी रुपये उधळून जाहिराती कुणी दिल्या, हे आपण जाहीर का करत नाही? करा जाहीर!
हेही वाचा :
प्रतीक्षा संपली! उद्या लाँच होतोय iPhone 17
हवेत खुर्च्या अशा पलटल्या की पाहून संपूर्ण इंटरनेट हादरलं… Video Viral
भाजप खासदाराच्या बहिणीचा सासरी छळ, आंघोळीचा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न Video Viral