सोशल मीडियावर नेहमीच अनेक नवनवीन व्हिडिओज(Video) व्हायरल होत असतानाच नुकताच इथे चिमुकल्यांच्या खेळाचा एक हादरवून टाकणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमधील दृश्य इतकी थरारक आणि अंगावर काटा आणणारी आहेत की ती पाहून कुणीही आश्चर्याने चकित होईल. वास्तविक, या व्हिडिओमध्ये काही मुले एका पाळण्यावर खेळताना दिसून येत आहेत पण हा पाळणा काही साधा नव्हे तर साहसाने भरलेला हा पाळणा आहे. हा खेळ खेळताना चिमूल्यांचे हाल असे बेहाल होतात की पाहून युजर्स पण घाबरून जातात. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.

व्हायरल व्हिडिओमध्ये (Video)आपण पाहू शकता, यात एका पाळण्यात काही मुले हवेच्या वेगात अवकाशात झुलताना दिसून येतात. दृश्य पाहता हे एका पार्कमध्ये घडत असल्याचे जाणवते जिथे अन् खेळ देखील आहेत. एका दोरीला काही खुर्च्या बांधण्यात आल्या असून या खुर्च्या एका मागून एक वेगाने झुलत असतात आणि यासहच या खुर्च्यांवर बसलेली मुलेही एका मागून एक जोरजोरात हवेसह पुढे झेपावली जात असतात.

व्हिडिओत एका मुलाची खुर्ची हवेत झुलत असतानाच बाजूला उभ्या असलेल्या मिनी ट्रेनला जाऊन आढळते ज्यामुळे खुर्चीचा बॅलन्स बिघडतो यामुळे मुलालाही दुखापत झाल्याचा अंदाज आपण लावू शकतो. व्हिडिओमध्ये या खुर्च्या काही क्षणानंतर एकमेकांवर आदळताना दिसून येतात जे पाहून सर्वांच्याच हृदयाचा ठोका चुकला. युजर्सने या राईडला एक भयानक आणि धोकादायक राईड मानलं आणि लहान मुलांसाठी असे खेळ घातक ठरू शकतात अशी प्रतिक्रियाही व्यक्त केली.

या खतरनाक राईडचा व्हिडिओ @crazy.comment.zone नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “प्रीमियम सीट होती वाटत ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बम्पी राईड” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे भयानक आहे”.

हेही वाचा :

प्रतीक्षा संपली! उद्या लाँच होतोय iPhone 17

मनोज जरांगे पाटलांची फडणवीस सरकारला नवी डेडलाईन

PSI मध्ये मुलींमध्ये पहिली, IAS होण्याचं स्वप्न पण आयुष्याची झुंज हरली

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *