बंगालच्या उपसागरात पुन्हा तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात शनिवारपासून मुसळधार पावसाचा(rain) अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ज्याचा सर्वाधिक परिणाम मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांवर होणार असून, इथं अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली असली तरीही आता मात्र, पुढील 24 तासांमध्ये प्रामुख्यानं दक्षिण कोकणामध्ये काही दुर्गम भागांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी असेल. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाच्या मध्यम स्वरुपातील सरींची हजेरी असेल. दरम्यानच्या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी राहणार असल्याच कारणानं किनारपट्टी भागांतील गावं, शहरांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाचा(rain) हा जोर शनिवार, रविवार आणि काही अंशी सोमवारपर्यंत कायम राहणार आहे असा प्राथमिक अंदाज वर्तवत ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडे निर्माण झालेलं कमी दाबाचं क्षेत्र पुढील 48 तासांमध्ये पश्चिम वायव्येस पुढे जाणार असल्याच कारणानं राज्याच्या अंतर्गत भागांसह कोकणालाही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
रविवार हा सुट्टीचा वार असल्या कारणानं अनेक मंडळी भटकंतीचा बेत आखत असतील. मात्र पाऊस त्यांची तारांबळ उडवू शकतो. कारण, रविवारी राज्यातील ठाणे, मुंबईसह, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून, कोल्हापूर, सातारा, पुण्यातीच घाट क्षेत्र, परभणी, बीड, जालना इथंही ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईत थंडी?
दमदार पावसानंतर(rain) मुंबई शहरात मागील काही दिवस पावसानं उघडीप दिली असली तरीही गेल्या 24 तासांमध्ये एकाएकी शहरातील तापमानात घट नोंदवण्यात आली. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रानं हा आकडा 29.7 अंश सेल्सिअसवर असल्याचं सांगितलं. पहाटेच्या वेळी शहरात थंड वाऱ्यांचे झोत येत असल्यानं हे अनपेक्षित वातावरण नागरिकांना मात्र दिलासा देऊन जात आहे. तर, नवी मुंबई परिसरातही अशीच काहीशी स्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा :
‘या’ बाईक्सच्या किमतीत कपात, जाणून घ्या
वयाच्या 40 व्या वर्षी करा अशी प्लॅनिंग, व्हा मालामाल
आतड्याचे आजार होतील झटक्यात दूर, योगगुरू रामदेव बाबांनी सांगितलं