सध्या जगभरातील क्रिकेटप्रेमींचं(cricketer) लक्ष आशिया चषक स्पर्धेकडे असतानाच एका क्रिकेटरने मैदानात नगाडं होऊन फिरण्यासंदर्भातील विधान केलं आहे. या खेळाडूच्या विधानाने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आपल्या वडिलांचं हे विधान ऐकून त्याच्या मुलीनेही प्रतिक्रिया नोंदवली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या क्रिकेटपटूने स्वत:बद्दल नाही तर अन्य एका खेळाडूबद्दल बोलताना हे विधान केलं आहे.

ज्या खेळाडूबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे, मॅथ्यू हेडन! ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर असलेल्या हेडनने केलेल्या विधानाने खळबळ उडली असली तरी त्याचं हे विधान आशिया चषकासंदर्भात नसून अ‍ॅशेस 2025 संदर्भात आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या या मालिकेआधी इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जो रूटबद्दल बोलताना हेडनने एक रंजक भाकीत केलं आहे. जो रूटच्या फलंदाजीसंदर्भातील विश्वास व्यक्त करताना हेडनने नग्नावस्थेत मैदानात फिरण्याचं विधान केलं आहे.

हेडनने दावा केला आहे, की जर इंग्लंडचा हा स्टार खेळाडू आगामी अ‍ॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावू शकला नाही तर तो मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर म्हणजेच एमसीजीमध्ये सर्व कपडे काढून फिरेल. क्रिकेटमध्ये(cricketer) सक्रीय असताना मैदानात आणि मैदानाबाहेर लार्जर-दॅन-लाइफ व्यक्तीमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिग्गज सलामीवीराने ‘ऑल ओव्हर बार द क्रिकेट’ यूट्यूब चॅनेलवरील चर्चेदरम्यान हे विधान केलं आहे.

21 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या अ‍ॅशेस मालिकेसाठी इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर येणार आहे. याच दौऱ्यात रूट ऑस्ट्रेलियाच्या मैदानावरील शतकाचा दुष्काळ दूर करेल असा विश्वास हेडनने व्यक्त केला आहे. “जर त्याने या समर सीझनमध्ये शतक झळकावलं नाही तर मी एमसीजीमध्ये कपडे काढून फिरेन,” असं हेडन म्हणाला आणि पॅनेलबरोबच प्रेक्षकांमध्येही एकच हशा पिकला.

‘ऑल ओव्हर बार द क्रिकेट’च्या(cricketer) इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हेडनच्या या विधानाची एक पोस्ट करण्यात आली. या पोस्टवर हेडनची मुलगी ग्रेस हेडनने एक मजेदार प्रतिक्रिया नोंदवली आहे. ग्रेसने रूटला टॅग करुन, “प्लिज रूट, शतक झळकव,” अशी विनंती केली आहे. या कमेंटमध्ये ग्रेसने हसण्याचा इमोजीही पोस्ट केलाय. तिच्या या कमेंटचा स्क्रीनशॉट व्हायरल झालाय.

34 वर्षीय रूट हा सध्याच्या घडीला कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक समजला जातो. मात्र असं असतानाही ऑस्ट्रेलियामध्ये रूटला एकही शतक झळकावता आलेलं नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 14 कसोटी सामन्यांमध्ये या उजव्या हाताच्या फलंदाजाने 35.6 च्या सरासरीने 892 धावा केल्या आहेत. यामध्ये नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र त्याला शतक झळकावता आलेलं नाही.

हेही वाचा :

ChatGPT सारख्या चॅटबोट्समुळे पुन्हा येऊ शकते कोरोनासारखी महामारी!

मैत्रीणीसाठी रागाच्या भरात कंपनी कर्मचाऱ्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

मोदीजी अ‍ॅक्शन मोडमध्ये! ट्रम्पच्या 50% टॅरिफवर करणार पुढचा हल्ला

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *