राज्यभरात पुन्हा एकदा पावसाने(rain) जोर धरला आहे. कोकण किनारपट्टीवरील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मराठवाडा आणि विदर्भ भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. आष्टी तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या भागात हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांचे रेस्क्यू करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात देखील जोरदार पाऊस(rain) सुरू आहे. नदी, नाले ओढे तुडुंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. आष्टी तालुक्यात पुरस्थिती इतकी गंभीर झाली की तिथे हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांची सुटका करण्याची वेळ आली.
आष्टी तालुक्यात काही ठिकाणी पुराचे पाणी शिरले आहे. अनेक घरांमध्ये पाणी देखील शिरले आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी कमांडो पथक आणि हेलिकॉप्टरची मदत घ्यावी लागली. हेलिकॉप्टरच्या मदतीने पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे.
पूरग्रस्त भागातून आतापर्यंत शेकडो नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. स्थानिक आमदारांनी देखील तातडीने सूत्र हलवत या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान या भागात अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले जात आहे.
पुढील दोन ते तीन दिवसंर राज्यात मुळसहदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. आष्टी तालुक्यात आलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा :
“लग्न करीन” म्हणून मैत्रिणीला लॉजवर नेलं, शरीर संबंधाची मागणी केली, नकार देताच…
महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा पॅटर्न बदलणार? ‘हा’ नवा पॅटर्न लागू होण्याची शक्यता
आता UPI द्वारे करा 10 लाख रुपयांपर्यंतचे पेमेंट; नवीन नियम आजपासून लागू