मूल्यांकन वर्ष 2025-26 साठी आयकर रिटर्न(income tax) भरण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर होती. मात्र, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ती एक दिवसाने वाढवून 16 सप्टेंबर 2025 केली. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक करदात्यांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे हा फैसला रात्री उशीरा घेण्यात आल्याने सर्वांनाच प्रश्न पडला – मध्यरात्री का घेतला हा निर्णय?

CBDT कडून दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभर आयकर रिटर्न(income tax)फाईल करण्याच्या प्रक्रियेत अनेक तांत्रिक अडचणी आल्या. आयकर विभागाची अधिकृत वेबसाइट वारंवार क्रॅश होत होती, तर काहीवेळा अपडेटच होत नव्हते. यामुळे लाखो करदात्यांना ITR फाईल करता आला नाही. अनेकांनी एक्सवर सरकारला टॅग करून तक्रारी नोंदवल्या होत्या.

करदात्यांच्या तक्रारींनी सरकार हलले :
संपूर्ण दिवसात आलेल्या तक्रारींचा पाऊस आणि करदात्यांवर आलेला ताण पाहून सरकारने अखेर मध्यरात्री बैठकीत निर्णय घेतला. करदात्यांना विना-दंड आणखी एक दिवसाची मुदत मिळावी, यासाठी तातडीने सूचना देण्यात आल्या. त्यामुळे आता करदाते 16 सप्टेंबर 2025 रोजीपर्यंत आपला ITR दाखल करू शकतात.

वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, सनदी लेखपाल आणि कर सल्लागारांनीही CBDT कडे तक्रारी पोहोचवल्या होत्या. तांत्रिक अडचणींमुळे शेवटच्या दिवशी रिटर्न फाईलिंगचा मोठा बोजा तयार झाला होता. हीच प्रमुख कारणे मध्यरात्री घेतलेल्या निर्णयामागे होती.

आकडेवारी काय सांगते? :
CBDT च्या आकडेवारीनुसार, 15 सप्टेंबर 2025 पर्यंत रेकॉर्डब्रेक 7.30 कोटींहून अधिक ITR दाखल करण्यात आले. गेल्या वर्षी हाच आकडा 7.28 कोटी इतका होता, तर 2023-24 या निर्धारण वर्षात 6.77 कोटी करदात्यांनी ITR दाखल केला होता. प्रत्येक वर्षी रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

मात्र या प्रचंड संख्येमुळे सिस्टमवर ताण वाढला आणि तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे अंतिम दिवशी फाईलिंग सुरळीत न झाल्याने सरकारला डेडलाईन वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागला.

करदात्यांना काय फायदा? :
ज्या करदात्यांना 15 सप्टेंबरपर्यंत रिटर्न फाईल करता आला नाही, त्यांना आता एक दिवसाची अतिरिक्त संधी मिळाली आहे. आजपर्यंत आयटीआर दाखल करणाऱ्यांना कोणताही दंड बसणार नाही. त्यामुळे करदात्यांनी विलंब न करता आजच रिटर्न फाईल करणे महत्त्वाचे ठरेल.

हेही वाचा :

महाराष्ट्रात सरकारी नोकरीचा पॅटर्न बदलणार? ‘हा’ नवा पॅटर्न लागू होण्याची शक्यता

“लग्न करीन” म्हणून मैत्रिणीला लॉजवर नेलं, शरीर संबंधाची मागणी केली, नकार देताच…

‘या’ तालुक्यात ढगफुटीसदृश पाऊस; हेलिकॉप्टरच्या मदतीने नागरिकांचं रेस्क्यू

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *