OpenAI ने लाँच(launched)केलेले AI चॅटबोट ChatGPT प्रत्येक युजरसाठी फायद्याचे ठरत आहे. शाळेतील असाईंमेंट असो नाहीतर ऑफीसमधील कामं, ChatGPT त्यांच्या युजर्सना सर्व कामात मदत करतो. मात्र अलीकडेच ChatGPT वर काही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. असं सांगितलं जात होतं की, ChatGPT मुळे एका 16 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. याबाबत अनेक दावे प्रतिदावे देखील करण्यात आले आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेत आता ChatGPT ने 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्ससाठी ChatGPT चे नवीन वर्जन लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.

ChatGPT चं नवीन वर्जन होणार लाँच
अशी माहिती समोर आली आहे की, OpenAI आता 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्ससाठी एक नवीन ChatGPT वर्जन लाँच(launched) करण्याची तयारी करत आहे. Microsoft-बॅक्ड या AI कंपनीने सांगितलं आहे की, स्टँडर्ड चॅटबॉट वर्जनवर 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या युजर्सचा अॅक्सेस रोखण्यासाठी ऐज-प्रेडिक्शन टेक्नोलॉजीचा वापर केला जाणार आहे. ही घोषणा अशा वेळी करण्यात आली आहे जेव्हा नवीन संशोधन आणि एका प्रकरणामुळे किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर AI च्या परिणामाबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नक्की प्रकरण काय?
एप्रिल महिन्यात 16 वर्षांच्या ॲडम रेन याने आत्महत्या केल्याचं समोर आलं. या प्रकरणानंतर त्याच्या पालकांनी ऑगस्ट महिन्यात OpenAI विरोधात खटला दाखल केला. यावेळी OpenAI आणि ChatGPT वर असे आरोप करण्यात आले होते की, ChatGPT ने रेन ला आत्महत्येचे प्लॅनिंग करण्यासाठी एखाद्या ‘कोच’ सारखी मदत केली आहे. तक्रारीत असं सांगण्यात आलं आहे की, चॅटबॉटने ॲडम रेनला सांगितले की चिंता आणि नकारात्मक विचारांशी झुंजणाऱ्या अनेक लोकांना ‘एस्केप हॅच’ सारखी कल्पना केल्यास आराम मिळतो. कारण यामुळे त्यांना पुन्हा नियंत्रण मिळवण्याची भावना देते.
या प्रकरणानंतर OpenAI ने अनेक नवीन अपडेट्स सादर केले आहेत. यामध्ये आत्महत्येशी संबंधित संभाषणांसाठी सुधारित सुरक्षा उपाय, नवीन पालक नियंत्रणे आणि दीर्घकाळ चालणाऱ्या चॅट हाताळण्यासाठी नवीन सिस्टमचा समावेश करण्यात आला आहे. कंपनीने असं देखील सांगितलं आहे की, जर त्यांचे टूल्स एखाद्या युजरचे वय आत्मविश्वासाने सांगू शकत नसतील, तर अंडर-18 वर्जन बाय डीफॉल्ट सक्रिय करेल.
ChatGPT चे नवीन टीनेज वर्जन कसे काम करेल?
ChatGPT च्या या नवीन वर्जनमध्ये पालक त्यांचे अकाऊंट मुलांच्या अकाऊंटसोबत लिंक करू शकणार आहेत. यामुळे ते चॅटबॉट इंटरॅक्शन त्यांच्या वयानुसार आणि योग्य नियमांनुसार मॅनेज करू शकतील. मेमरी आणि चॅट हिस्ट्रीसारखे फीचर्स पालक ऑन/ऑफ करू शकणार आहेत. जर चॅटबोटला वाटलं की, मुलगा चिंतेत आहे, तर यासंबंधित अलर्ट देखील पालकांना दिला जाणार आहे. एक असा पर्याय देखील असेल जिथे पालकांना ‘ब्लॅकआउट ऑवर्स’ सेट करण्याची परवानगी दिले जाते. यावेळी मुले ChatGPT वापरू शकत नाहीत.
OpenAI नेहमी हेच सांगतो की, ChatGPT केवळ 13 वर्षे आणि त्याहून अधिक वय असलेल्या युजर्ससाठी उपलब्ध आहे. वॉशिंग्टन, डीसी येथे किशोरांसाठी AI चॅटबॉट्समधील रिस्कवर चर्चा करणारी सिनेट सुनावणी सुरू असताना नवीनतम अपडेट आली आहे. यात जोश हॉलीसह अनेक रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक सिनेटर उपस्थित आहेत.
हेही वाचा :
सांगलीत पॉलिशच्या बहाण्याने तीन लाखांचे सोने लंपास
नवरात्रीत ‘या’ 10 वस्तू घरी आणाल तर सोबत देवीची कृपाही येईल!
रीलच्या नादात तरुणाला दोऱ्याने लटकवलं, मुलीला पाण्यात बुडवलं; Video Viral