सोने(Gold) पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने तब्बल दोन लाख 80 हजार रुपयांचे दागिने लंपास झाल्याची धक्कादायक घटना मोहिते वडगाव येथे मंगळवारी (दि. 16) दुपारी घडली. या प्रकरणी चिंचणी-वांगी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दुर्गेश किसनकुमार गुप्ता (रा. म्हैसूर बाजार, जमालपूर, जि. खगडिया) याला रात्री उशिरा अटक केली असून त्याचे साथीदार योगेश यादव व विकास सहा हे फरार आहेत.
माहितीनुसार, सुलोचना भिकाजी मोहिते (वय 70) या दुपारी घरी एकट्याच होत्या. तिघे संशयित त्यांच्या घरी आले व “सोने पॉलिश करून देतो” असे सांगितले. त्यानंतर सुलोचना यांनी सोन्याच्या बांगड्या व पाटल्या असे एकूण 56 ग्रॅम दागिने(Gold) दिले. संशयितांनी ते दागिने लिक्विडमध्ये घालण्याचा बहाणा करत बनावट सोने परत केले आणि पसार झाले.
सुलोचना यांना काही वेळानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सहायक पोलिस निरीक्षक राहुल घुगे व उपनिरीक्षक योगेश शेलार यांच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला. अखेर रात्री दुर्गेश गुप्ता पोलिसांच्या हाती लागला. इतर दोघा संशयितांचा शोध सुरू आहे.
हेही वाचा :
2025 साठी बाबा वेंगाचं सर्वांत मोठं भाकीत!
खूप दिवस डिटॉक्स चहा पिणे आरोग्यासाठी चांगले आहे की हानिकारक?
आदिवासींचा एल्गार; सरकारला झुकवणार?