भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त(birthday) त्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. फिल्म इंडस्ट्रीतील प्रतिष्ठित प्रोडक्शन हाऊस सिल्वर कास्ट क्रिएशंस ने त्यांच्या जीवनावर आधारित बायोपिकची घोषणा केली आहे. या चित्रपटाचं नाव ‘माँ वंदे’ असं असून त्याची निर्मिती वीर रेड्डी एम करणार आहेत. यासोबतच सोशल मीडियावर चित्रपटाचा पोस्टरही रिलीज झाला आहे जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

या बायोपिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका प्रसिद्ध मल्याळम अभिनेता उन्नी मुकुंदन साकारणार आहे. उन्नी मुकंदनने ‘मार्को’ या चित्रपटातून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. ‘माँ वंदे’मध्ये नरेंद्र मोदी(birthday) यांच्या प्रेरणादायी प्रवासाची कथा दाखवली जाणार आहे. त्यांच्या बालपणीच्या संघर्षांपासून ते राष्ट्रीय नेते होईपर्यंतच्या प्रवासापर्यंत.
चित्रपटात त्यांच्या आई हिराबेन मोदी यांच्याशी असलेल्या अतूट नात्याचा देखील सुंदर चित्रपटण करण्यात येणार आहे. त्यांच्या आयुष्यात आईचे योगदान आणि त्यांचा आधार कसा राहिला यावर विशेष भर दिला जाणार आहे. चित्रपटाला भव्य प्रमाणावर साकारण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न आहे.
त्यासाठी उच्च दर्जाच्या VFX चा वापर केला जाणार असून हा चित्रपट पॅन इंडिया स्तरावर प्रदर्शित होईल. तसेच इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे. लोकांना एक अद्वितीय सिनेमॅटिक अनुभव देणे आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा मिळावी हा या चित्रपटामागचा उद्देश आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन क्रांती कुमार सीएच करणार आहेत. ‘बाहुबली’सह अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये त्यांनी सिनेमॅटोग्राफी हाताळली आहे. त्यामुळे या बायोपिकला भव्य आणि प्रभावशाली दृश्यरचना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडपासून साऊथपर्यंतच्या कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. काहींनी व्हिडिओ शेअर करून त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली तर काहींनी त्यांना ‘देशाचा खरा पुत्र’ म्हणून गौरवले.
‘माँ वंदे’ हा चित्रपट केवळ एक बायोपिक नाही तर नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी प्रवासाचे सादरीकरण असणार आहे. त्यांच्या संघर्षाची, मातृप्रेमाची आणि नेतृत्वाची कथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक भव्य प्रयत्न आहे. चित्रपटाची भव्य निर्मिती, अनेक भाषांमध्ये रिलीज आणि तांत्रिक दर्जा यामुळे हा चित्रपट मोठ्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा :
पंतप्रधान मोदींच्या आईच्या AI व्हिडिओवर उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
आगामी निवडणुका आघाडी म्हणून लढवणार का? शरद पवारांचं मोठं विधान
6 वर्षाच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून क्रुरतेने ढकलतानाचे CCTV फुटेज समोर