सरकारी अख्तयारित येणाऱ्य़ा विविध विभागांमध्ये सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी(employees) केंद्रानं आणखी एक मोठं दिलासादायक पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. ज्यामुळं पुढच्या महिन्यात नोकरदार वर्गाच्या खात्यात येणारा पगाराचा आकडा वाढू शकतो.

प्राथमिक माहितीनुसार महागाई भत्ता 58 टक्क्यांनी वाढू शकतो. जुलै- डिसेंबर 2025 साठी महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. असं झाल्यास सध्याच्या घडीला 55 टक्क्यांवर असणाऱ्या DA चं प्रमाण वाढून 58 टक्क्यांवर जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या आकडेवारीचा थेट परिणाम नोकरदार वर्गाच्या पगार आणि पेन्शनवरव होणार आहे.
वर्षातून दोन वेळा होतं DA रिविजन
केंद्रीय कर्मचारी(employees) आणि पेन्शनझारकांना देण्यात येणारा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवण्यात येतो. जानेवारी ते जून आणि जुलै ते डिसेंबरदरम्यान विविध टक्केवारीच्या फरकानं हे डीए रिविजन केलं जातं. उदाहरणार्थ, मार्च 2025 मध्ये सरकारनं जानेवारी- जून कालावधीसाठी डीए 2 टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. तर, यंदा ही वाढ 3 टक्क्यांनी वाढेल असं म्हटलं जात आहे.
पगार आणि पेन्शनचं गणित समजून घ्या…
डीए अर्थात महागाई भत्ता कायमच मूळ पगारावर निर्धारित केला जातो. ज्यामुळं त्याचं एकूण प्रमाण व्यक्तीनुरूप वेगळं असू शकतं. समजा पेन्शनधारकांचं मूळ वेतन 9000 रुपये आहे, तर 55 टक्के महागाई भत्त्याच्या हिशोबानं त्यांना या भत्त्यासाठी 4950 रुपये मिळतात. म्हणजेच एकूण पेन्शन 13950 रुपयांवर जाते. येत्या काळात जर डीए 58 टक्क्यांवर पोहोचला तर, याच कर्मचाऱ्यांना 5220 रुपये मिळणार असून, एकूण पेन्शनची रक्कम 14220 वर पोहोचणार आहे.
राहिला प्रश्न पगाराचा तर, कोणा कर्मचाऱ्याचा मूळ पगार 18000 रुपये असल्यास 55 टक्के महागाई भत्त्यासह त्यांना 9900 रुपये मिळतील आणि एकूण पगार 27900 रुपयांवर पोहोचेल. मात्र आता डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ होऊन तो 58 टक्क्यांवर पोहोचल्यास हातात येणारा एकूण पगार असेल 28440 रुपये.
DA ची ही रक्कम CPI-IW वर आधारित असून, त्याच आकड्याला अनुसरून महागाई भत्ता निर्धारित केला जातो.
हेही वाचा :
ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या! मुख्यमंत्र्यांकडे मागणी
ऐश्वर्या-अभिषेकचा घटस्फोट होणार? सासर सोडून ती माहेरी राहायला गेली
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठं गिफ्ट