बॉलीवूडमधील सर्वात चर्चेत असलेल्या जोडप्यांपैकी एक म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. सोशल मीडियावर सतत बातम्या येत होत्या की, ऐश्वर्या आपल्या सासरच्या घरातून बाहेर पडून माहेरी राहत आहे आणि लवकरच अभिषेकसोबत घटस्फोट(divorce) घेणार आहे.

जवळच्या व्यक्तीकडून पोलखोल :
प्रसिद्ध अॅडफिल्म मेकर प्रल्हाद कक्कर, जे ऐश्वर्याचे जुने मित्र आहेत आणि त्याच इमारतीत राहतात, यांनी या सर्व अफवांना फेटाळून लावलं आहे. त्यांच्या मते, ऐश्वर्या माहेरी राहत नाही, तर आईची तब्येत बरी नसल्याने ती तिला भेटायला जाते. सकाळी मुलगी आराध्याला शाळेत सोडल्यानंतर आणि तिला आणण्यापूर्वी मिळालेल्या वेळेत ती आईसोबत काही क्षण घालवते. त्यामुळे लोकांनी याला चुकीचा अर्थ लावला.
काही दिवसांपूर्वी अशाही बातम्या पसरल्या की, जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्याशी मतभेद झाल्याने ऐश्वर्या घटस्फोट (divorce) घेण्याचा विचार करत आहे. मात्र कक्कर म्हणतात की, “ती अजूनही घराची सून आहे, घर चालवते आणि या सर्व बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.” त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे.
अभिषेकचीही काळजी :
कक्कर यांनी स्पष्ट केलं की, ऐश्वर्या तिच्या आईला भेटायला जाते तेव्हा कधी कधी अभिषेक बच्चनही तिच्यासोबत जातो. यावरून दोघांच्या नात्यात तणाव असल्याच्या बातम्या निराधार असल्याचं दिसून येतं.
प्रल्हाद कक्कर यांच्या मते, अभिषेक आणि ऐश्वर्या दोघांनीही या बातम्यांवर भाष्य केलेलं नाही कारण त्यांना स्वतःच्या आयुष्याची प्रतिष्ठा राखायची आहे. “लोक बोलत राहतात, पण ते दोघेही आपल्या सन्मानाला जपतात,” असं ते म्हणाले.
18 वर्षांचं नातं :
2007 मध्ये झालेल्या त्यांच्या विवाहाला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना आराध्या नावाची मुलगी आहे. नुकतेच हे तिघे सुट्टीहून परतताना विमानतळावर दिसले होते. ऐश्वर्या शेवटची 2023 मध्ये पोन्नियिन सेल्वन २ चित्रपटात दिसली, तर अभिषेक अलीकडे कालिधर लपटा या चित्रपटात झळकला होता.
हेही वाचा :
पंतप्रधान मोदींच्या आईच्या AI व्हिडिओवर उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
आगामी निवडणुका आघाडी म्हणून लढवणार का? शरद पवारांचं मोठं विधान
6 वर्षाच्या चिमुकलीला तिसऱ्या मजल्यावरून क्रुरतेने ढकलतानाचे CCTV फुटेज समोर