बरेली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक तरुण त्याच्या मेहुणीसोबतच पळून गेला. तरुणाने पत्नीच्या बहिणीलाच(crime) पळवून नेल्याचे समोर आले मेहुणीसोबत पळून गेल्याचे लक्षात येताच तिच्या भावाने तरुणाच्या बहिणीलाच पळवून नेले आहे.

पोलिसांनी मंगळवारी या घटनेची पुष्टी करत माहिती दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरानिया गावातील रहिवाशी केशव कुमार त्याच्या 19 वर्षीय मेहुणीला(crime) घेऊन पळून गेला. त्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचा मेहुणा रवींद्र केशव कुमारच्या बहिणीसोबत पळून गेला.
प्रभारी निरीक्षक अरुण कुमार श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव कुमार आणि त्याच्या मेहुणीला व बहिणीला 15 आणि 15 सप्टेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयाच्या सहमतीने प्रकरण संपवण्यात आले आहे. तसंच, कोणतीही कारवाई न करण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,देवरानिया ठाणे क्षेत्रातील गावाचा रहिवाशी केशव याचे सहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघांना दोन मुलंदेखील आहेत. पोलिसांनी सांगितले की, संसार सुरू असतानाच तरुणाचा त्याच्या मेहुणीवर जीव जडला. तर केशवची बहिणीचे त्याचा मेहुणा रविंद्रवर प्रेम होते. दोघांचे अफेअरदेखील सुरू झाले होते.
या घटनेनंतर दोन्ही कुटुंबामध्ये तणावाचा वातावरण होते. दोन्ही जोडप्यांना एकत्र राहुद्यात असा सल्ला कुटुंबीतील जेष्ठांनी दिला. त्यामुळं पोलिस ठाण्यातच हे प्रकरण सोडवण्यात आले. मात्र या प्रकरणाची संपूर्ण शहरात एकच चर्चा होती.
हेही वाचा :
ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी ५० हजार द्या! मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना मोठं गिफ्ट
1 कोटी कर्मचाऱ्यांसह पेन्शनधारकांची दिवाळी; पुढच्या महिन्यातील पगारात 58% …