“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे श्री स्वामी समर्थांनी(Swami Samarth) त्यांच्या भक्तांना दिलेलं वचन आहे. स्वामी कायम सांगतात की परमेश्वराची भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा नव्हे, देवाला धूप कपूर, फुलं अपर्ण केली सोन्या-चांदीची मूर्ती घरात आणली, देवाची स्तुती गायली म्हणजे परमेश्वराची भक्ती केली असा त्याचा अर्थ होत नाही. माणसाने परमार्थ मिळवला पाहिजे, तुमचं कर्म स्वच्छ असलं की सगळं साध्य होतं. कर्माचा फेरा कोणालाही चुकलेला तुमचं कर्म फिरून तुमच्याकडे येतं जर कर्म स्वच्छ असेल तर तुमच्या वाट्याला सगळं चांगलंच येतं. माणसाच्या अंगी समोरच्याला मदत करण्याची वृत्ती हवी हा आपण कोणाला मदत करतोय हे देखील कळायला हवं. याच कर्माबाबत स्वामींनी एक गोष्ट सांगितली.

अक्कलकोटला जेव्हा स्वामी(Swami Samarth) वास्तव्याला होते त्यावेळी त्यांनी एक कथा सांगितली एक आख्यायिका सांगितली होती. जंगलातील वाघ आणि वाघीण शिकारीसाठी बाहेर पडतात. एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन चार पाच म्हणता1म्हणता महिना गेला. या महिन्याभरात त्या गुहेत असलेल्या बछड्यांना एक बकरी पाहत होती. त्या बकरीला बछड्यांची दया आली. वाघ आणि वाघीण शिकार घेऊन येईपर्यंत तिने त्या बछड्यांना तिचं दूध पाजलं.

महिना होऊन गेला गुहेत वाघ आणि वाघीण परतले होते. ते त्यांच्या बछड्यांना सांगत होते की कसे ते शिकार शोधायल वणवण केली ते. नेमकं त्यांच वेळी बकरी नेहमीप्रमाणे बछड्यांना दूध पाजायला आली. बकरीला पाहताच वाघाने तिच्या झडप घालण्याचा प्रयत्न केला. बकरीला पंजा मारणार तितक्यात त्या बछड्यांनी वाघाला अडवलं. बछडे म्हणाले बाबा या बकरीची शिकार करू नका. जेव्हा आई आणि तुम्ही शिकारीसाठी बाहेर गेला तेव्हापासून महिनाभर ही बकरी आम्हाला तिचं दूध पाजतेय. तिच्या दुधामुळे आज आम्ही जिवंत आहोत. हे ऐकताच वाघ त्या बकरीची क्षमा मागतो आणि तिला म्हणतो तुझ्या दुधामुळे आज माझे बछडे जिवंत आहेत, मी तुझा आभारी आहे. आजपासून या जंगलात कोणताही हिंस्र प्राणी तुझी शिकार करणार नाही. या जंगलात तू मुक्तपणे वावरू शकतेस हे अभय मी तुला देतो. ज्याच्या एका डरकाळीने अवघ जंगल सळो की पळो होतं तोच बलाढ्य वाघ आपल्याला अभय देतोय हे पाहून बकरीने देखील वाघाचे आभार मानले.

हे सगळं एक गरुड आभाळातून पाहत होता. त्याला बकरीला मिळालेल्या अभयाबतात विलक्षण कुतूहल वाटलं. मग या गरुडाने मनात ठरवलं की, आपण ही अशीच कोणाची तरी मदत करायची मग या बकरीला मिळाली तशी शाबासकी मलाही मिळेल. गरुड विचार करत होता की असं काय करू की मला त्या बकरीसारखी शाबासकी मिळेल. विचारात गर्क असलेल्या गरुडाने पाहिलं की, एका घुशीची पिल्लं गोंगाट करत होती. थोड्या जवळ गेल्यावर गरुडाला कळलं की,या पिल्लांची आई जवळ नाहीये. मग गरुडाने ठरवलं की हीच ती वेळ आहे, मी यांची मदत केली तर मलाही शाबासकी मिळेल. गरुडाने त्या पिल्लांना पंखाखाली घेत ऊब दिली. पिल्लांची आई आल्यावर तिने गरुडाला हकलवून दिलं.

गरुड तिथून निघून गेला पण तो विव्हळत होता. त्याच्या पंखाला खूप जखमा झाल्या होत्या. जेव्हा त्याने घुशीच्या पिल्लांना पंखाखाली घेतलं तेव्हा त्या पिल्लांनी त्यांची पंख कुडतडली. घायाळ झालेला गरुड बकरीला जाऊन भेटला. घडलेला सगळं प्रकार त्याने बकरीला सांगितला. गरुडाने बकरीला प्रश्न केला की, मदत तू ही केलीस आणि मी ही मग तुला शाबासकी आणि मला जखमा असं का ?

रडवेल्या गरुडाला बकरीने शांतपणे सांगितलं. अरे मी ज्या पिल्लांना दूध पाजलं ती कोणी साधी सुधी नव्हती. वाघ कधीही विनाकारण हव्यासापोटी शिकार करत नाही. त्याचं पोट भरलं असलं की कितीही त्याच्या समोरून जा तुला काहीच करणार नाही, वाघ तत्वनिष्ठ आहे तो उगाच कोणालाही त्रास देत नाही. आणि त्याची पिल्लं देखील त्याच्याच वळणावर जाणार हे मला माहितेय. पण तू ज्याला मदत करायला निघालास त्याला ओळखलं नाहीच आणि तिथेच तू फसलास घुशीच कामचं दुसऱ्याला इजा करण्याचं आहे. ज्या घराचा घराचा घेते त्यालाच पोखरते हे तुला ओळखता आलेलं नाही.आणि तिथेच तू फसलास. तू कोणाला मदत करतोय हे तर तू ओळखलं नाहीस शिवाय तुला मदत केल्यावर मिळणाऱ्या शाबासकीची अपेक्षा होती आणि तिथेच तुझा अपेक्षाभंग झाला.

श्री स्वामी समर्थांनी(Swami Samarth) सांगितलेल्या या कथेतून तात्पर्य काय निघत तर एकतर कोणाला मदत करण्याची वृत्ती ही निर्मळ असावी त्यात कोणताही लोभ नसावा शाबासकीच्या स्वार्थासाठी बकरीने बछड्यांना दूध पाजलं नव्हतं. तिच्या दूध पाजण्यात मातृत्व होतं. ती कोणाला आणि कशासाठी दूध पाजतेय हे तिला माहीत होतं. मात्र गरुडाने शाबासकीच्या मोहासाठी घुशीच्या पिल्लांची मदत केली आणि त्या पिल्लांची गरुडाचे पंख कुडतडले. यातून अशीही शिकवण मिळते की एकतर तुम्ही कोणाला करत असलेली मदत ही निस्वार्थ असावी त्याच बरोबर आपण ज्याला मदत करतोय तो त्या मदतीला पात्र आहे का हे वेळीच ओळखलं तर आपल्याला इजा होत नाही. स्वामी सांगतात सेवाभावी व्हा सेवेकरी व्हा पण खरी खोटी माणसं देखील ओळखा आणि आलंच तुमच्यावर कोणतं संकट तर आम्ही कायम असू, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे….”

हेही वाचा :

‘मिस्टर फडणवीस, शिवसेनेच्या नादाला लागू नका!’, संजय राऊतांचा थेट इशारा

‘माझ्या गर्लफ्रेंडशी का बोलतो?’ बॉयफ्रेंडकडून त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार, रक्तरंजित थरार

आधी प्रेयसीला गुलाल लावला, मग Kiss करायला गेला अन्…Video Viral

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *