सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक जण लहानसहान वाटणाऱ्या (attacks)आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करतात. कामाचा ताण, वेळेचा अभाव आणि ‘आपोआप बरं होईल’ ही मानसिकता यामुळे डॉक्टरांकडे जाणं टाळलं जातं. मात्र हीच सवय अनेकदा जीवघेणी ठरू शकते. कारण काही गंभीर आजारांची सुरुवातीची लक्षणं अतिशय साधी असतात. ती वेळीच ओळखली गेली नाहीत, तर त्याचे परिणाम अचानक आणि गंभीर स्वरूपात दिसून येतात.हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, हार्ट अटॅक म्हणजे केवळ छातीत तीव्र वेदना होणे, हा मोठा गैरसमज आहे. विशेषतः महिलांमध्ये हार्ट अटॅकची लक्षणं पुरुषांपेक्षा वेगळी आणि अधिक ‘सायलेंट’ असतात. त्यामुळे अनेक महिलांना हार्ट अटॅकचा धोका असल्याचं कळतच नाही. पुरुषांमध्ये छातीत तीव्र दुखणं, घाम फुटणं किंवा अचानक झटका येणं ही ठळक लक्षणं दिसतात. मात्र महिलांमध्ये अॅसिडिटी, फ्लू, सतत थकवा, मानसिक ताण यासारखी साधी वाटणारी लक्षणं दिसून येतात.

तज्ज्ञ सांगतात की, हार्ट अटॅकच्या वेळी छातीतच वेदना होतील असं नाही. (attacks)अनेक महिलांना जबडा, मान, खांदा किंवा पाठीमध्ये तीव्र वेदना जाणवतात. कधी कधी छातीत जडपणा जाणवतो किंवा आतून कुणीतरी दाबत असल्यासारखं वाटतं. हा त्रास अनेकदा मसल पेन किंवा ताण समजून दुर्लक्षित केला जातो, मात्र तो धोक्याचा इशारा असू शकतो.याशिवाय, पुरेशी झोप घेतल्यानंतरही अचानक आणि असह्य थकवा जाणवणं हे देखील हार्ट अटॅकचं महत्त्वाचं लक्षण आहे. संशोधनानुसार, हार्ट अटॅकच्या काही दिवस आधी विशेषतः महिलांमध्ये असा थकवा जाणवतो. कोणतंही जड काम न करता दम लागणं किंवा श्वास घेण्यास त्रास होणं ही हृदयापर्यंत रक्तपुरवठा कमी झाल्याची खूण असू शकते. अनेक महिला हा त्रास गॅस किंवा अॅसिडिटी समजून दुर्लक्ष करतात.
मळमळ, उलटी, अपचन किंवा पोटदुखी यासारख्या समस्या सतत जाणवत असतील, तर त्याकडेही गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. हार्ट अटॅकच्या आधी महिलांमध्ये अशी लक्षणं दिसू शकतात, मात्र ती फूड पॉइझनिंग किंवा पचनाच्या त्रासाशी जोडली जातात. तसेच कोणतंही कारण नसताना अचानक थंड घाम येणं, चक्कर येणं किंवा डोकं हलकं वाटणं हीही हृदयाच्या गंभीर समस्येची चिन्हं असू शकतात.रात्री झोप न लागणं, कारण नसताना अस्वस्थ वाटणं, भीती जाणवणं किंवा झोपेतून दचकून जाग येणं ही लक्षणंही दुर्लक्षित करण्यासारखी नाहीत. विशेषतः मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या महिलांनी या बाबतीत अधिक सतर्क राहण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. काही वेळा छातीत तीव्र वेदना न होता फक्त हलकासा दाब, जडपणा किंवा अस्वस्थता जाणवते. मात्र छातीत दुखत नाही म्हणून सुरक्षित आहोत, असा समज जीवघेणा ठरू शकतो.
हेही वाचा :
PM आवास योजनेचे नियम बदलले! आता ‘या’ लोकांना घरकुलाचा लाभ मिळणार नाही
बंद झालेला ₹१५०० चा हप्ता पुन्हा सुरू होणार? e-KYC वर मंत्र्याची मोठी घोषणा
फेब्रुवारीत ६ राजयोगांमुळे ‘या’ ५ राशींचे नशीब चमकणार, सुवर्णदिवस येणार