नवरात्रोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला असून, अनेकांनीच कुलदैवतांपासून ते अगदी प्रसिद्ध अशा शक्तिपीठांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. त्यातलंच एक ठिकाण म्हणजे करवीरनिवासिनी अंबाबाईचा निवास असणारं कोल्हापूर. वर्षाच्या बाराही महिने कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात भाविकांची रिघ असते. नवरात्रोत्सवात हा परिसर आणखी बहरून जातो. अशा या मंदिराला(Temple) इतके खांब आहेत, की त्याचं मोजमाप अद्यापही कोणालाच करता आलेलं नाही. किंबहुना या मंदिरात मोठा खजिना असल्याचंही म्हटलं जातं.

भक्तांच्या श्रद्धास्थानी असणाऱ्या संकटहरिणी अंबाबाई मंदिरात म्हणे अब्जावधींचा खजिना दडवण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी हे तळघर उघडण्यात आलं होतं, ज्यावेळी तिथं सोनं, चांदी आणि हिऱ्याचे दागिने असल्याचं स्पष्ट झालं. या खजिन्यामध्ये असणाऱ्या वस्तूंची नोंद ही भुवया उंचावणारी आहे.
खजिन्यामध्ये सोन्याच्या नाण्यांचा हार, सोनसाखळी, सोन्याची मोठी गदा, चांदीची तलवार, देवीचा मुकुट, श्रीयंत्र हार, हिऱ्यांचा हार, सोन्याचे घुंगरू अशा मुघल, आदिलशाही आणि पेशवेकालिन दागिन्यांचा समावेश आहे.
इतिहासकारांच्या माहितीनुसार कोल्हापूर इथं असणाऱ्या या महालक्ष्मी मंदिरात (Temple)कोकणातील राजांसमवेत चालुक्य, आदिलशाही, शिवराय, जिजाऊ यांनी आपआपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर दान केलं. हा खजिना मोजताना सीसीटीव्हीची देखरेख ठेवली जाते, शिवाय दागिन्यांचा विमाही काढला जातो. याआधी हा खजाना 1962 मध्ये मोजण्यात आल्याची माहिती मिळते.
अंबाबाई मंदिरात दिलेल्या शिलालेखानुसार हे मंदिर साधारण 1800 वर्षांहून अधिक जुनं असल्याचं सांगण्यात येतं. शालिवाहन काळातील राजा कर्णदेव यानं या मंदिराची स्थापना केली आणि पुढं या मंदिराभोवती इतर मंदिरं बांधण्यात आली. देवीच्या 51 शक्तिपीठांमध्ये या मंदिराचाही समावेश होत असून, असं म्हणतात की, आदि शंकराचार्य यांनी मंदिरात श्री देवी महालक्ष्मीच्या मूर्चची प्राण प्रतिष्ठा केली होती.
असं म्हणतात की इथं सतीचं तिसरं नेत्र पडलं होतं. ज्यामुळं तिथं महालक्ष्मीचा वास आहे. या मंदिराच्या चहूदिशांना कवाडं असून, मंदिर प्रशासन असा दावा करतं की मंदिरांच्या खांबांची मोजणी अद्यापही कोणाला करता आलेली नाही. कॅमेरानंही हा प्रयत्न करण्यात आला मात्र तिथंही हाती अपयशच आल्यानं हे रहस्य आजही अनुत्तरितच राहिल्याचं म्हटलं जातं.
(टीप : वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित आहे. आम्ही याची खातरजमा करत नाही.)
हेही वाचा :
‘मिस्टर फडणवीस, शिवसेनेच्या नादाला लागू नका!’, संजय राऊतांचा थेट इशारा
‘माझ्या गर्लफ्रेंडशी का बोलतो?’ बॉयफ्रेंडकडून त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार, रक्तरंजित थरार
आधी प्रेयसीला गुलाल लावला, मग Kiss करायला गेला अन्…Video Viral