काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषद घेत असून यावेळी त्यांनी निवडणूक(latest political news) आयोगावर गंभीर आरोप केला. काही ठिकाणी काँग्रेसच्या समर्थनार्थ जाणारी मतं जाणीवपूर्वक वगळल्याचं राहुल गांधींनी यावेळी सांगितलं. मतचोरीच्या आरोपांबाबत राहुल गांधी पत्रकार परिषदेत अनेक मोठे खुलासे केले.

राहुल गांधी यांनी मत चोरीचा आरोप केला. त्यांनी पुरावेही सादर केले आणि निवडणूक आयोगाच्या संरक्षणाखाली हे घडत असल्याचा दावा केला. निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. मात्र आता राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राहुल गांधी यांना सुनावले आहे.
राहुल गांधी(latest political news) यांनी काही दिवसांपूर्वी हायड्रोजन बॉम्बसाठी तयार राहावे असा इशारा दिला होता. त्यानुसार त्यांनी आज पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. यावर आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी पुरावे असल्यास सुप्रीम कोर्टात जावे असे म्हटले आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, “त्यांना काही काम धंदा उरलेला नाही. ते लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. कॉँग्रेसचा चेहरा आहेत. त्यांना रोज काहीतरी बोलले पाहिजे. जर ते सरळ बोलले तर, त्याची दखल कोणी घेणार नाही.
राहुलक गांधी यांनी इतक्या वेळेस मांडणी करून ते अजून एकही गोष्ट सिद्ध करू शकले नाहीत. लोकसभा निवडणुकीत तुम्हाला महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये जास्त जागा मिळाल्या. मग तुम्ही त्या ठिकाणी मत चोरी केली का? तुमच्या बाजूने निकाल अलया की ईव्हीएम मशीन चांगले आणि विरोधात निकाल लागला की त्याच मशीनला चुकीचे म्हणणे योग्य नाही.
इतकेसे न समजायला लोक काय वेडी नाहीत. राहुल गांधींकडे पुरावे असतील तर त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात जावे. निवडणूक आयोगाने दखल घेतली नसेल तर सुप्रीम कोर्टात दाद मागता येते. तिथेही दखल नाही घेतली तर डिव्हिजनमध्ये जाता येते. त्यामुळे रोज उठून इलेक्ट्रॉनिक मीडियाचा स्पेस खाऊ नये.
हेही वाचा :
कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील तळघरात दडलंय तरी काय?
वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू
लेस्बियन किसिंग सीनमुळे गाजलेली मराठी अभिनेत्री; ट्रॉलर्सला दिलं सडेतोड उत्तर