आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी भारत-पाकिस्तान (cricket) सामन्याबाबत मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. पाकिस्तान सरकारने 1 फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध 15 फेब्रुवारीला होणाऱ्या सामन्यावर बहिष्कार जाहीर केल्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली होती. या निर्णयामागचं ठोस कारण अद्याप समोर आलेलं नसतानाच पाकिस्तानवर चौफेर टीका झाली. भारत-पाकिस्तान सामना न झाल्यास केवळ चाहत्यांनाच नव्हे, तर आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डालाही मोठा आर्थिक फटका बसणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अशातच आता या वादाला नवं वळण मिळालं आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, (cricket) पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यासाठी एक अट घातल्याची चर्चा आहे. बांगलादेशचा या टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा समावेश झाला, तरच पाकिस्तान भारताविरुद्ध मैदानात उतरेल, असा अप्रत्यक्ष संदेश दिला जात असल्याचं समजत आहे. भारत-पाकिस्तान सामना कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणार असून बांगलादेशने मात्र सुरक्षेचं कारण देत स्पर्धेतून माघार घेतली आहे.
बांगलादेशच्या माघारीनंतर आयसीसीने त्यांच्या जागी स्कॉटलंडला (cricket) संधी दिली. पाकिस्तान आधीच आर्थिक अडचणीत असताना भारताविरुद्धच्या सामन्यामुळे होणारी हजारो कोटींची कमाई गमावणं त्यांना परवडणारं नाही. त्यामुळे पाकिस्तान आपली भूमिका कायम ठेवणार की आयसीसी आणि जागतिक क्रिकेटमधील संबंध जपण्यासाठी निर्णय मागे घेणार, याकडे साऱ्या क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलं आहे.
हेही वाचा :
एकाच दगडात अनेक पक्षी गार; शरद पवारांचा ‘पॉवर’गेम
8 व्या वेतन आयोगाने वेग पकडला, केंद्रीय कर्मचाऱ्यांना बजेटमध्ये मिळणार सरप्राइज?
सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी, बारामतीत घडामोडींना वेग