गुजरातमधील सुरत शहरात बुधवारी रात्री पांडेसरा परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. केवळ ५० रुपयांच्या किरकोळ वादातून मित्रांमध्ये(friend) झालेल्या भांडणात एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिट्टू सिंग अवधिया याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याचे काही मित्र(friend) तिरुपती सर्कलजवळील भोजनालयात जमले होते. खर्चासाठी सर्वांनी मिळून पैसे दिले होते, मात्र अनिल राजभर याने दिलेले ५० रुपये परत मागत उत्सवात सहभागी होण्यास नकार दिला. एवढ्याशा कारणावरून सुरू झालेला वाद काही क्षणांतच रक्तरंजित ठरला.
वादाच्या दरम्यान भगतसिंग आणि अनिल यांनी बिट्टूशी झटापट केली. त्यात भगतसिंगने वाइपर रॉडने हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो अपयशी ठरला. यानंतर संतापलेल्या बिट्टूने चाकू काढून भगतसिंगच्या पाठीवर वार केले. अनिलने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, बिट्टूच्या साथीदार चंदन दुबेने अनिलला पकडून ठेवले आणि बिट्टूने त्याच्यावरही छाती व हातावर वार केले.
गंभीर जखमी भगतसिंगला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर अनिलची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेनंतर पांडेसरा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी बिट्टू सिंग अवधिया आणि चंदन दुबे यांना अटक केली. त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
आधी प्रेयसीला गुलाल लावला, मग Kiss करायला गेला अन्…Video Viral
आयुष्यात येणारी खरी खोटी माणसं कशी ओळखवीत? श्री स्वामी समर्थांचा मोलाचा सल्ला
कोल्हापुरच्या अंबाबाई मंदिरातील तळघरात दडलंय तरी काय?