रॉजर बिन्नी यांच्यानंतर बीसीसीआयचा(BCCI) नवीन बॉस कोण होणार याकडे संपूर्ण जगाच्या क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. यातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बीसीसीआय अधिकाऱ्यांची बैठक होणार असून या बैठकीनंतर 28 सप्टेंबर रोजी बीसीसीआयच्या नवीन अध्यक्षांची घोषणा करण्यात येणार आहे. सध्या उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.

बीसीसीआयचे(BCCI) अधिकारी 20 सप्टेंबर रोजी दिल्लीत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांशी भेट घेणार आहे आणि याच दिवशी बीसीसीआय अध्यक्षपदाचा निर्णय देखील घेतला जाणार आहे. तर 28 सप्टेंबर रोजी याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती क्रिकबझकडून देण्यात आली आहे.

बीसीसीआय अधिकाऱ्यांची ही भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या निवासस्थानी होणार आहे. तर दुसरीकडे सध्या समोर आलेल्या माहितीनुसार अध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये हरभजन सिंग, कर्नाटकचे माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू रघुराम भट आणि माजी भारतीय यष्टीरक्षक किरण मोरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.

बीसीसीआयचे निवडणूक अधिकारी ए.के. जोती यांच्या 6 सप्टेंबरच्या अधिसूचनेनुसार, “आक्षेपांवर तपासणी आणि निर्णय ( 2) अंतिम मतदार यादी जारी करण्याची” अंतिम तारीख 19 सप्टेंबर आहे. याचा अर्थ असा की राज्य संघटना पुढील 24 तासांत वार्षिक सर्वसाधारण सभेत (एजीएम) त्यांचे नामांकित उमेदवार बदलू शकतात. त्यामुळे हरभजन सिंग, रघुराम भट आणि किरण मोरे यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा :

बियर पिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता 200 रुपयांची बाटली मिळणार फक्त इतक्या रुपयांत…

संजू राठोडने “सुंदरी” गाण्याने यूट्यूब फॅनफेस्ट 2025 मध्ये आणली रंगत, प्रेक्षकांसमोर प्रीमियर!

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का! बदलले परीक्षा नियम, मोठी अडचण…

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *