मुंबईत यूट्यूब फॅनफेस्ट 2025 दरम्यान संगीताची प्रचंड ऊर्जा अनुभवायला मिळाली, जेव्हा उत्साही आणि जबरदस्त परफॉर्मर संजू राठोडने आपल्या नव्या सिंगल ‘सुंदरी’ या गाण्याचा(song) थेट प्रीमियर केला आणि संपूर्ण चाहत्यांच्या गर्दीत धमाका केला. जेव्हा ‘सुंदरी’ म्युझिक व्हिडीओ मोठ्या स्क्रिनवर प्रदर्शित झालं त्यानंतर संजूनं केलेला खास लाईव्ह परफॉर्मन्स संपूर्ण गर्दीला थिरकवून गेला. यानंतर जेव्हा त्याने आपले व्हायरल चार्टबस्टर्स “गुलाबी साडी” आणि “शॅकी” सादर केले, तेव्हा गर्दी जल्लोषात बुडून गेली – आणि त्याचा परफॉर्मन्स या फॅनफेस्टमधील एक अविस्मरणीय क्षण ठरला.

“सुंदरी” हे गाणं(song) संजू राठोड यांनी गायले असून संगीतबद्ध केले आहे. तर जी-स्पार्क यांनी त्याची निर्मिती केली आहे. हे गाणं एक वेगळंच मिश्रण आहे. मराठी लोकसंगीताचा आत्मा, कमर्शियल पॉपची ऊर्जा आणि सुंदर फ्यूजन असं हे गाणं आहे. त्याची धक्कादायक साउंडस्केप, अत्याधुनिक VFX आणि सिनेमॅटिक व्हिज्युअल्समुळे “सुंदरी” केवळ गाणं नसून एक संगीतमय आणि दृश्यात्मक अनुभव आहे.
लॉन्चबद्दल बोलताना संजू राठोड म्हणाला, “‘शेकी’ आणि ‘गुलाबी साडी’ ला जे प्रेम मिळालं, त्याने मला प्रत्येक गाण्यासोबत अधिक मोठं काहीतरी देण्याची प्रेरणा दिली. ‘सुंदरी’ हे माझ्यासाठी खास आहे. हे आपल्या संस्कृतीशी जोडलेलं आहे, पण त्यात एक फ्रेश आणि ग्लोबल वाईब आहे. यूट्यूब फॅनफेस्टमध्ये हे लॉन्च करणं खरंच जादूई होतं कारण हा संगीतातील उत्सव आहे, त्या चाहत्यांबरोबर हे गाणं शेअर करायला धमाल आली जे हा प्रवास खास बनवतात. ‘सुंदरी’वर हजारोंची गर्दी थेट थिरकताना पाहणं—हा क्षण मी आयुष्यभर जपून ठेवणार आहे”.
Believe Artist Services च्या पाठबळाने संजू राठोडचे संगीत आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचत आहे. त्यांच्या गाण्यांचे प्रमोशन आणि रिलीज सर्व प्रमुख प्लॅटफॉर्म्सवर कौशल्याने केले जात आहे, जेणेकरून ते अधिकाधिक चाहत्यांपर्यंत पोहोचू शकतील. “सुंदरी” चं भव्य लॉन्च हे Believe चं कलाकारांना प्रोत्साहन देण्याचं आणि संगीतसृष्टीत आपली पकड वाढवण्याचं प्रतीक आहे.
संजू राठोडसोबत यावर्षीच्या यूट्यूब फॅनफेस्टमध्ये कुशा कपिला, फराह खान, पायल धारे, आदित्य कुलश्रेष्ठ (कुल्लू), अंशू बिष्ट (गेमरफ्लीट), करिश्मा गंगवाल (rjkarishma), शक्ती मोहन, आणि लिसा मिश्रा यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी सहभाग घेतला. “सुंदरी” आता संजू राठोडच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर exclusive स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.
हेही वाचा :
चंद्रकांत पाटलांनी Rahul Gandhi यांना दिला कोल्हापुरी ‘झटका’; म्हणाले, “उठसूट इलेक्ट्रॉनिक मीडियाचा…”
लेस्बियन किसिंग सीनमुळे गाजलेली मराठी अभिनेत्री; ट्रॉलर्सला दिलं सडेतोड उत्तर
वाढदिवसाच्या पार्टीत येण्यास नकार, ५० रुपयांसाठी मित्र बनला हैवान, छातीत भोसकला चाकू