उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एका नवरीने आपल्या नवऱ्याच्या अनैतिक संबंधाचा राग थेट कृतीत दाखवला. संशयामुळे नवरीने आपल्या नवऱ्यावर पाळत ठेवली आणि त्याला त्याच्या गर्लफ्रेंडसोबत (girlfriend)रंगेहाथ पकडले. दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण महिलेनं दोघांनाही पकडून बेदम मारहाण केली. ही घटनेची परिस्थिती इतकी हायव्होल्टेज होती की, सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमा झाली.

महिलेच्या नवऱ्याने प्रेयसीला वाचवण्याचा प्रयत्न केला, परंतु रस्त्यावर दीड तास तिघांचा वाद सुरू राहिला. पोलिस घटनास्थळी धाव घेतले आणि तिघांनाही समजावून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश मिळाले नाही. पोलिसांच्या उपस्थितीतही नवरीने नवऱ्याच्या प्रेयसीचे केस ओढले आणि कानशिलातही मारहाण केली. या हायव्होल्टेज ड्रामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महिला आणि नवऱ्याचे लग्न तीन वर्षांपूर्वी झाले असून त्यांना दीड वर्षांची मुलगी आहे. महिलेला नवऱ्यावर संशय होता आणि बदलत्या स्वभावामुळे तिने त्याचा पाठलाग केला. १९ सप्टेंबर रोजी नवरा हॉटेलमध्ये प्रेयसीसोबत(girlfriend) जाताना पाहून तिचा राग अनावर झाला. खोलीत पोहोचताच तिने नवऱ्याला जाब विचारला आणि दोघांनाही मारहाण सुरू केली.

गिडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप महिलेनं कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. जर तक्रार दाखल केली गेली, तर कारवाई केली जाईल, असा पोलिसांचा इशारा आहे.
हेही वाचा :
आजोबांनी मेट्रोमध्येच दिला होकार…सर्वांसमोरच केली….
AI मुळे पुरूष की महिला कोणाच्या नोकऱ्यांवर येणार गदा
अनैसर्गिक शरीरसंबंध, नवरा चुकीच बोलला, नंतर….