हाथरस, उत्तर प्रदेश येथे घरगुती वाद इतके गंभीर झाले की एका महिलेने आपल्या पतीविरुद्ध(husband) FIR नोंदवली आहे. पीडितेने तक्रारीत आरोप केला आहे की, तिचा नवरा आणि सासरकुटुंब अनेक महिलांसोबत अनैतिक संबंध ठेवतात आणि तिला हुंड्यासाठी सतत त्रास देतात. महिलेला घरातून काढून लावले गेले असून, तिच्यावर लाठी-काठीने मारहाणही झाली.

माहितीनुसार, पीडित महिला वर्षभरापूर्वी मथुरा जिल्ह्यातील फरह येथील तरुणाशी हातरस जंक्शन क्षेत्रातील लग्नात जोडली गेली होती. लग्नात वडिलांनी जवळपास 12 लाख रुपये खर्च केले, पण सासरीकडे हा खर्च योग्य वाटला नाही. पत्नीच्या आरोपानुसार, नवरा(husband) तिला अनेकदा म्हणतो की, “तुझ्यासारख्या 300-300 रुपयात मिळतात, मी तुला नांदवणार नाही”. तसेच नवरा तिच्यासोबत अनैसर्गिक संबंध ठेवतो आणि तिने विरोध केल्यास उपाशी ठेवतो, काही दिवस काही खायला देत नाही.

पीडितेने सांगितले की, तिने नातं टिकवण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु नवरा आणि सासरकुटुंबाचा छळ संपत नव्हता. सुरुवातीला तिने काही गोष्टींकडे दुर्लक्ष केले, जेणेकरून नवरा सुधारेल, पण परिणाम झाला नाही. पोलिसांनी घरगुती हिंसाचार आणि हुंड्यासाठी छळ या कलमांखाली गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
हेही वाचा :
महिला पोलीस अधिकाऱ्याची शिवीगाळ, बॅच काढून फेकून मारला…
‘जेव्हा माझ्या GF होत्या, तेव्हा माझ्या आईचे BF होते’, अभिनेत्रीच्या मुलाचा धक्कादायक खुलासा
पती-पत्नीला एकत्र नोकरी करता येणार नाही! ‘या’ बँकेने घेतला मोठा निर्णय