ई-रिक्षा(e-rickshaw) चार्जिंगला लावत असताना विद्युत करंट लागून पिता-पुत्रांच्या मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील संत रविदास वार्ड येथे घडली. नरेश बरियेकर (वय 55 वर्ष) आणि दुर्गेश नरेश बरियेकर (वय 22 वर्ष) असे मृत पिता-पुत्राचे नाव आहे.

संत रविदास वॉर्डातील नरेश बरियेकर हे त्यांची ई-रिक्षा(e-rickshaw) चार्जिंगला लावत असताना अचानक टिनाच्या शेडला विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने शेडमधून विद्युत प्रवाह शटरमध्ये आला. यावेळी नरेश बरियेकर यांनी शटरला स्पर्श करताच त्यांना विजेचा शॉक बसला. यावेळी त्यांचा मुलगा दुर्गेश याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता, त्यालाही विजेचा शॉक लागला. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती तिरोडा पोलिसांना दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. सध्या तिरोडा पोलीस पुढील तपास करीत आहेत. मात्र पिता-पुत्राच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून बरियेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हेही वाचा :
सार्वजनिक ठिकाणी नेत्यांचे पुतळे उभारण्यास बंदी; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
एक किस क्या क्या कर सकती है! Kiss देताच डझनभर लोक… Video Viral
EPFO नियमात मोठा बदल होणार? ७ कोटी पीएफ धारकांना दिलासा मिळणार