केरळमधील थिरुवल्ला येथील एका स्पा सेंटरमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे.(center) खंडणीचे पैसे देण्यास नकार दिल्याने, एका स्पा सेंटरमधील महिलेवर बंदुकीचा धाक दाखवत सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.धक्कादायक म्हणजे हे नराधम एवढ्यावरच न थांबता त्यांनी महिलेवर अत्याचार करताना त्याचे व्हिडिओ आणि सेल्फी काढले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर ४ जण फरार आहेत. या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, १ फेब्रुवारी रोजी थिरुवल्ला येथील (center) एका स्पा सेंटरमध्ये ६ जणांच्या ग्रुपने अचानक घुसखोरी केली. ही टोळी काही काळापासून स्पा व्यवस्थापनाला त्रास देत होती. शिवाय ५०,००० हजार रुपयांची मागणी देखील करत होती. मात्र वारंवार स्पा सेंटरचे मालक आणि कर्मचारी त्यांना पैसे देण्यास नकार देत होते.१ फेब्रुवारी रोजी दुपारी मात्र या टोळीने स्पा सेंटरमध्ये गोंधळ घातला. शिवाय हातातील शस्त्रांनी कर्मचाऱ्यांना धमकावलं. यानंतर या टोळीतील एक गुंड महिलेला शेजारील रूममध्ये जबरदस्ती घेऊन गेला. तिच्यावर बंदूक रोखत, धमकावत तिला स्पा बेडवर ढकलले. तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

धक्कादायक म्हणजे आरोपींनी या कृत्याचे चित्रीकरण केले, सेल्फी काढले (center) आणि महिलेवर हल्ला केला. याप्रकरणी महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर ४ जण अद्यापही फरार आहेत. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत असून या घटनेतील आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून काही दिवसांपूर्वी त्यांची जेलमधून सुटका झाली असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.

हेही वाचा :

पुण्यातून एकही ST बस मुंबईला जाणार नाही; सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पालघरसह ST च्या 139 बसेस रद्द

खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?

सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *