राज्यात पोलिस भरती जाहीर झाली आहे. प्रत्यक्ष पोलिस भरती प्रक्रियेला (date) सुरुवात १६ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. पुणे शहर पोलिस दलात एकूण ६३३ पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी तब्बल ३९ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहे.पोलिस भरतीच्या पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने तयारीसाठी आता पोलिक प्रशासन सज्ज झालं आहे. यासाठी पोलिस मुख्यालय आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या गट क्रमांक दोन मैदानाव चाचणी होणार आहे.

या भरतीमध्ये अनेक पदे आहेत. पोलिस अंमलदार, वाहनचालक, (date)पोलिस बँडसमन अशा एकूण १६३३ पदांचा समावेश आहे. पोलिस भरतीची मैदानी आणि शारीरिक चाचणी १६ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. यानंतर उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
कशी असणार भरती प्रक्रिया?
शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड (date)केली जाणार आहे.
यामध्ये उमेदवारांची उंची आणि छाती मोजली जाणार आहे.
१०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे महिलांसाठी ८०० मीटर,गोळाफेक याद्वारे उमेदवारांची निवड करणार आहे. या चाचणीसाठी १०० गुण असणार आहे.त्यापैकी ५० गुण मिळवणे आवश्यक आहे.भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार होऊ नये. यासाठी ‘आरएफआयडी’ तंत्रज्ञान आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणारआहे. यामुळे उमेदवारांची उपस्थिती धावण्याची वेळ याबाबत माहिती मिळणार आहे.
हेही वाचा :
खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?
सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार