उत्तरप्रदेश येथील मेरठमध्ये लोकप्रिय युट्युबर शादाब जकाती पुन्हा (expresses) एकदा वादात सापडला आहे. यावेळी छत्तीसगडमधील एका महिलेने त्याच्यावर गंभीर आरोपण केले आहेत. पीडित महिलेने सांगितले की व्हिडिओ प्रोमोट करण्यासाठी शादाब जकातशी संपर्क साधला होता. यामध्ये त्यांचे बोलणे वाढत गेले आणि त्यांची मैत्री झाली. मैत्रीचा गैरफायदा उचलून त्याने बलात्कार केला असा पीडितीने आरोप लावला आहे.

पीडित महिलेचा आरोप आहे की शादाब जकातीने सुमारे दीड वर्षे तिला (expresses)घाबरवून-धमकावून शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती वारंवार विरोध करत होती. मात्र शादाब तिला धमक्या देत मानसिक दबाव टाकून तिच्यावर अत्याचार करत राहिला. तसेच शादाब जकातीची पत्नीही तिच्यासोबत मारहाण करत असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. शादाब आणि त्याची पत्नी दोघांनी मिळून अनेकदा तिच्यावर शारीरिक हिंसा केल्याचेही ती सांगते. एवढेच नाही तर पीडितेच्या पतीला जीवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्याचा आरोप आहे.

पीडित महिला स्वतः सोशल मीडियावर सक्रिय असून फेसबुक आणि (expresses)इन्स्टाग्रामसाठी रील्स बनवते. याच सोशल मीडिया कामाच्या निमित्ताने प्रमोशनसाठी तिने शादाब जकातीशी संपर्क साधल्याचे ती सांगते. शादाब जकातीमुळे तिला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला जीवाला धोका असल्याचा आरोप पीडितेने केला आहे. पीडितेचा पती सध्या दिहाडी मजुरी करतो आणि तो अत्यंत भयभीत अवस्थेत आहे. कुटुंबाने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे पीडित महिलेने मेरठ येथील इंचौली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार तहरीर दाखल करून संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे प्रकरणाची चौकशी सुरू असून तपासानंतर पुढील कारवाई केली जाईल.

हेही वाचा :

पुण्यातून एकही ST बस मुंबईला जाणार नाही; सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पालघरसह ST च्या 139 बसेस रद्द

खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?

सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *