पंजाबच्या जालंधर शहरात शुक्रवारी पहाटे आम आदमी पार्टीचे (leader) पदाधिकारी लकी ओबेरॉय यांची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या करण्यात आली. मॉडेल टाऊन परिसरात गुरुद्वाराबाहेर घडलेल्या या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. हल्लेखोरांनी थार कारमध्ये बसलेल्या ओबेरॉय यांच्यावर गोळीबार केला असून या घटनेनंतर राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, लकी ओबेरॉय गुरुद्वाराबाहेर त्यांच्या थार गाडीत बसलेले असताना अचानक हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडायला सुरुवात केली. एकूण १६ राउंड फायर करण्यात आले, त्यापैकी पाच गोळ्या ओबेरॉय यांना लागल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरात एकच गोंधळ उडाला आणि लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. अनेक दुकानदारांनी घाबरून तात्काळ आपापली दुकाने बंद केली

घटनेनंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून पळून गेले. जखमी (leader) अवस्थेत ओबेरॉय यांना सुरुवातीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गोळीबार इतका अचानक आणि जोरात झाला की काही क्षणांत संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून घटनास्थळावरून अनेक रिकाम्या काडतुसे जप्त करून ती फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. पोलिस आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत असून हल्लेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे

या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून अतिरिक्त (leader) पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आम आदमी पार्टीच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून दोषींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासात वैयक्तिक शत्रुत्व किंवा राजकीय कारणांमुळे हा हल्ला झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, लकी ओबेरॉय हे जालंधर कॅन्ट प्रभारी राजविंदर कौर थियाडा यांचे निकटवर्तीय असल्याची माहितीही समोर आली आहे.

हेही वाचा :

पुण्यातून एकही ST बस मुंबईला जाणार नाही; सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पालघरसह ST च्या 139 बसेस रद्द

खुशखबर! आयकर विभागात नोकरीची संधी; पगार ८१,८०० रुपये; अर्ज कसा करावा?

सेमीफायनलमध्ये अफगाण शतकी जोडीचा धडाका! भारतासमोर 311 धावांचे तगडे लक्ष्य, फायनलची लढत रंगणार

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *