गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या(gold) दरात चढ-उतार होताना दिसत आहे. सोन्याच्या दर गगनाला भिडले आहेत. 24 कॅरेट सोन्याचे दर लाखावर पोहोचले आहेत. ऐन सणासुदीच्या दिवसांत सोनं किचिंत स्वस्त झालं आहे. आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सोनं स्वस्त झाल्याने ग्राहकांना किचिंतसा दिलासा मिळाला आहे.

सोन्याने एका वर्षात ग्राहकांना चांगला परतावा दिला आहे. 24 कॅरेट सोन्याचे दर 11 सप्टेंबर 2024 रोजी 73,200 इतके होते. तर आज सोन्याचे दर थेट लाखापार गेले आहेत. आज नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 24 सप्टेंबरचा सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाल्यास आज सोनं किंचितसे स्वस्त झाले आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 320 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळं प्रतितोळा सोनं 1,15,370 रुपयांवर सोनं पोहोचलं आहे.

आज 22 कॅरेट सोन्याच्या (gold)दरात 300 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 1,05,750 रुपयांवर स्थिरावलं आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा दरात 240 रुपयांची घट झाली असून प्रतितोळा सोनं 86,530 रुपयांवर स्थिरावलं आहे.

आजचा सोन्याचा भाव काय?

ग्रॅम सोनं किंमत
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,05,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,15,370रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 86,530 रुपये

ग़्रॅम सोनं किंमत
1 ग्रॅम 22 कॅरेट 10,575 रुपये
1 ग्रॅम 24 कॅरेट 11,537 रुपये
1 ग्रॅम 18 कॅरेट 8,653 रुपये

ग्रॅम सोनं किंमत
8 ग्रॅम 22 कॅरेट 83, 840 रुपये
8 ग्रॅम 24 कॅरेट 92,296 रुपये
8 ग्रॅम 18 कॅरेट 69, 416 रुपये

मुंबई – पुण्यात कसे असतील सोन्याचे दर?
10 ग्रॅम 22 कॅरेट 1,05,750 रुपये
10 ग्रॅम 24 कॅरेट 1,15,370रुपये
10 ग्रॅम 18 कॅरेट 86,530 रुपये

सोन्याचे दर वाढण्यामागे सणासुदीच्या काळातील वाढती मागणी, आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी, आणि फेडरल रिझर्व्हच्या अलीकडील निर्णयांचा प्रभाव आहे. स्पॉट गोल्ड 1.1 टक्क्यांनी वाढून $3,683.24 प्रति औंसवर बंद झाले आहे, तर या आठवड्यात सोन्याच्या किमतीत 11 टक्क्यांची वाढ झाली आहे.

सणासुदीच्या काळात आणि आर्थिक अनिश्चिततेच्या वेळी सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. सातत्याने वाढणारे दर आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चमक यामुळे अनेकजण सोन्याकडे गुंतवणुकीसाठी आकर्षित होत आहेत.

सोन्याचे दर स्थानिक मागणी, पुरवठा, कर, आणि स्थानिक बाजारपेठेतील मध्यस्थांच्या शुल्कांवर अवलंबून असतात. तथापि, सध्या मुंबई आणि पुण्यातील दर वर नमूद केल्यानुसार एकसमान आहेत.

हेही वाचा :

कतरिना कैफ ४२ व्या वर्षी आई होणार…४० नंतर गर्भधारणा शक्य आहे…

WhatsAppच्या नव्या अटींमुळे युजर्स फसले

अतिवृष्टीमुळे डोळ्यांत पाणी, मुख्यमंत्री फडणवीसांनी केली पाहणी…..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *