महाराष्ट्रात सध्या जोरदार पाऊस(rain) थैमान घालत असून, मराठावड्यासह अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सोलापूर, लातूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये गावं, घरं, शेती सगळं पाण्याखाली गेल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकांना राहायला जागा नाही, कोरडे कपडे नाहीत आणि अन्नाचा तुटवडा आहे.

याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा सध्या माढ्यातील निमगाव येथे सुरू आहे, जिथे पावसामुळे(rain) शेती, घरं आणि लोकांचे जीवन मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी निमगाव आणि आसपासच्या गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला, स्थानिक अधिकारी आणि नागरिकांच्या तक्रारी ऐकल्या. शेतकऱ्यांनी त्यांच्या भेटीत अतिवृष्टीमुळे होणाऱ्या नुकसानाची सविस्तर माहिती दिली. उंदरगाव, वाकाव, दारफळ आणि सीना नदीच्या पट्ट्यात येणाऱ्या गावांमध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, हे त्यांनी थेट पाहिले. ड्रोनच्या माध्यमातून पूरग्रस्त भागांचे दृश्य आणि नुकसानाचा आढावा घेण्यात आला.

मुख्यमंत्र्यांना स्थानिक महिलांनीही परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. पिकांचे नुकसान, दाण्यांचे उडणे, पाणी साचणे याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सर्व मुद्दे मांडले. सर्व नागरिकांच्या तक्रारी ऐकल्यानंतर, फडणवीस यांनी योग्य ती मदत करण्यात येईल अशी ग्वाही दिली.मुख्यमंत्री फडणवीस पुढे दारफळ गावात जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत, तसेच शासनाकडून तातडीची मदत आणि पुनर्वसन योजना लागू करण्याबाबत मार्गदर्शन करतील.
हेही वाचा :
आश्रमाच्या नावाखाली ‘तसली कामं…’ या बाबानं 17 मुलींसोबत…
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात वाहतूक नियंत्रकाने घेतला गळफास
एटीएम कार्डधारकांनो सावधान! PIN सेट करताना ‘हे’ नंबर वापरले तर..