बॉलिवूड अभिनेत्री (actress)कतरिना कैफ प्रेग्नंट असल्याचे अखेर सत्य समोर आले आहे. कतरिना आणि विकी कौशल लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करून ही आनंदाची बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. रिपोर्टनुसार, कतरिना ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये पहिल्या मुलाला जन्म देणार आहे.सध्या कतरिनाचे वय ४२ वर्षे आहे, त्यामुळे चाहत्यांमध्ये एक प्रश्नही निर्माण झाला आहे – ४० नंतर नैसर्गिक गर्भधारणा होणे शक्य आहे का?

वयानुसार गर्भधारणेची शक्यता

स्त्रीरोगतज्ज्ञांच्या मते, महिलांची प्रजनन क्षमता ३५ वर्षांच्या वयानंतर हळूहळू कमी होऊ लागते आणि ४० वर्षांनंतर ती आणखी घटते. जन्माच्या वेळी एका महिलेच्या शरीरात सुमारे १० लाख अंडी असतात, पण काळाच्या ओघात त्यांची संख्या कमी होते. मेनोपॉजच्या सुमारे १५ वर्षांपूर्वी, बहुतेक चांगली अंडी नष्ट होतात.महिलांमध्ये दर महिन्याला ओव्हुलेशन होते, परंतु वयानुसार अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता कमी होत जाते. ३५ वर्षांनंतर निरोगी अंड्यांचा पुरवठा कमी होतो, ज्यामुळे नैसर्गिक गर्भधारणेची शक्यता घटते.

४० नंतर गर्भधारणेची जोखीम

गर्भपाताचा धोका वाढतो.

लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका जास्त असतो.

प्रसूतीदरम्यान सी-सेक्शनची आवश्यकता वाढते.

बाळाला डाउन सिंड्रोम, मानसिक विकार किंवा थायरॉईड समस्या होण्याची शक्यता थोडी वाढते, परंतु प्रत्येक प्रकरणात असे होत नाही.

तज्ज्ञांचा सल्ला

स्त्रियांनी ४० नंतर गर्भधारणेची योजना करताना वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. पुरेशी झोप, संतुलित आहार, मानसिक ताण टाळणे आणि नियमित तपासणी या काळात खूप महत्वाच्या आहेत. काही प्रकरणांमध्ये IVF (टेस्ट ट्यूब फर्टिलायझेशन) हा मार्ग वापरला जातो, पण वयानुसार यशस्वी होण्याची शक्यता कमी होते.कतरिना (actress)आणि विकीच्या चाहत्यांसाठी ही खुशखबर उत्साहवर्धक आहे, आणि तज्ज्ञांचा सल्ला लक्षात ठेवून, ४० नंतरही सुरक्षित गर्भधारणेसाठी योग्य काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा :

आश्रमाच्या नावाखाली ‘तसली कामं…’ या बाबानं 17 मुलींसोबत…

कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकात वाहतूक नियंत्रकाने घेतला गळफास

एटीएम कार्डधारकांनो सावधान! PIN सेट करताना ‘हे’ नंबर वापरले तर..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *