हाच तो क्षण! उद्धव – राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक फोटो

राज्यात हिंदी भाषा सक्तीचा निर्णय अखेर मागे घेण्यात आल्याने मराठी भाषिक जनतेसाठी हा एक मोठा विजय मानला जात आहे.(platform )याच विजयाचा उत्सव म्हणजे ‘मराठी विजयी सोहळा’, जो आज वरळी डोममध्ये मराठी माणसाच्या साक्षीने साजरा केला जात आहे. या ऐतिहासिक क्षणी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ एकाच मंचावर येऊन मराठी जनतेला संबोधित करणार आहेत. यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या सोहळ्याकडे लागले आहे.

‘ना कोणता झेंडा फक्त मराठी अजेंडा’ असं म्हणत राज ठाकरेंनी सर्व मराठी बांधवांना विजयी सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केलं होतं.(platform ) यावेळी वरळी डोम मराठी जनसागराने उसळला. एकाच मंचावर येण्यापूर्वी संपूर्ण डोमची लाईट बंद करण्यात आली होती. नंतर ठाकरे बंधूंची एन्ट्री होताच लाईटने डोम झगमगून उजाळून गेला.व्यासपीठावर एन्ट्री घेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना मिठी मारली. यावेळी संपू्र्ण डोम, ‘जय महाराष्ट्र’ म्हणत दुमदुमून गेला. दोन्ही ठाकरे बंधूंना एकाच मंचावर पाहिल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहायला मिळाला. यानंतर राज ठाकरेंनी उपस्थित जनसागराला संबोधित करण्यास सुरूवात केली.

तब्बल २० वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आल्यामुळे मराठी माणसाचं उर भरून आलं. (platform )आता प्रत्येक मराठी व्यक्तीचं लक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे आहे. दरम्यान, आज उद्धव आणि राज ठाकरे युतीची घोषणा करणार का? ठाकरे बंधूमध्ये मनोमिलन होणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.

हेही वाचा :