यंदाच्या दिवाळीच्या सणाला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या चेहऱ्यावर (workers)आनंद फुलवणारी बातमी आहे. महिला व बालविकास विभागाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट दिली जाणार आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.महाराष्ट्रातील अंगणवाडीसेविका आणि मदतनीस यांना 2,000 रुपये भाऊबीज देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शासनाने 40.61 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यासंदर्भातील शासन निर्णयही जाहीर झाला आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी यासंदर्भात माहिती दिली.

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या महिला आणि बालकांच्या पोषण, संगोपन आणि सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान देतात. त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून आणि सणाच्या काळात त्यांच्या आनंदात भर टाकण्यासाठी शासनाने ही रक्कम मंजूर केल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या. (workers)अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या खऱ्या अर्थाने समाजातील ‘शक्ती’ आहेत. त्यांचा सण उत्साहात साजरा व्हावा, हीच आमची इच्छा असल्याचे त्या म्हणाल्या.

या निर्णयानुसार, नवी मुंबई येथील आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, यांच्यामार्फत ही भाऊबीज भेट रक्कम लवकरच अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यात जमा होणार आहे.(workers) या गिफ्टमुळे राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची दिवाळी अधिक गोड आणि आनंदमय होणार आहे. हा निर्णय त्यांच्या कष्टाचं कौतुक करणारा असून, त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जातोय.
हेही वाचा :
वर्दीतल्या सैतानाचं हादरवणारं कृत्य!
PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी
YouTube वर आले जबरदस्त AI फीचर