महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजनेनंतर आता बिहार सरकारने महिलांसाठी(scheme)एक महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. ही योजना ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ या नावाने सुरू करण्यात आली आहे. या योजनेमुळे महिलांना आर्थिक सहाय्य देऊन रोजगारनिर्मिती आणि स्वावलंबनाला चालना देण्याचा उद्देश आहे. महत्त्वाचं म्हणजे, या योजनेचा पहिला टप्पा आज २६ सप्टेंबर २०२५ रोजी सुरू होत असून ७५ लाख पात्र महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये जमा होणार आहेत.

या कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार महिलांशी थेट संवाद साधणार आहेत. राज्यातील जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे, ज्यामुळे लाभार्थी महिलांना स्वतः पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे.(scheme) या संवादामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढेल आणि योजनेचा प्रभाव पडेल, असा सरकारचा विश्वास आहे.
या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत तब्बल १ कोटी ११ लाख महिलांनी अर्ज दाखल केले असून, पात्रतेनुसार ७५ लाख महिलांची निवड करण्यात आली आहे. पहिला टप्प्यातील १० हजार रुपयांची मदत रोजगारांची पायाभरणी करण्यासाठी उपयोगात येणार आहे.योजनेचा उद्देश फक्त तात्पुरती मदत करणे नसून दीर्घकालीन उत्पन्नाचे साधन निर्माण करणे हा आहे. महिलांनी जर शेती, पशुपालन, शिलाई मशीन किंवा इतर लघुउद्योग सुरू करण्यासाठी पावले उचलली तर पुढील टप्प्यात सरकारकडून २ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. या दिलेल्या पैशांमधून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करून परिवाराला आर्थिक आधार देऊ शकतील.

यासाठीच्या अर्ज प्रक्रियेत पारदर्शकता ठेवली आहे. लाभार्थी महिलांनी ‘जीविका स्वयं सहाय्यता समूह’ यामध्ये सामील होणे आवश्यक आहे. या समूहाच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य मिळेल. अर्ज करण्यासाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत, असं सरकारने सांगितलं आहे. (scheme)त्यामुळे ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर नसणाऱ्या महिलांनाही सहज संधी मिळेल.बिहार सरकारची ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ ही फक्त आर्थिक मदतीपुरती मर्यादित नसून, महिलांनी उद्योग सुरू करण्यासाठीचा मोठा प्रयत्न आहे. पहिल्या टप्प्यात १० हजार आणि नंतर २ लाख रुपयांच्या मदतीमुळे महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी मिळणार आहे.
हेही वाचा :
वर्दीतल्या सैतानाचं हादरवणारं कृत्य!
PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी
YouTube वर आले जबरदस्त AI फीचर