मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ सुरू ठेवण्यासाठी(Yojana) ई-केवायसी प्रक्रिया दरवर्षी करावी लागणार आहे. या प्रक्रियेचे पालन सर्व लाभार्थींना अनिवार्य करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात
४१० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग
राज्यातील सुमारे १ कोटी महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण
राज्य सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीपूर्वी मिळालेली ही आर्थिक मदत महिलांसाठी आनंदाची भेट ठरली आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे यावेळी हप्ता वेळेत मिळणार की नाही, (Yojana)अशी शंका व्यक्त केली जात होती. मात्र सामाजिक न्याय विभागाने सुमारे ४१० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग केल्याने शुक्रवारीपासून हप्ता जमा होऊ लागला आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया दरवर्षी करावी लागणार आहे. या प्रक्रियेचे पालन सर्व लाभार्थींना अनिवार्य करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत राज्यातील सुमारे १ कोटी महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, “योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी पुढील दोन महिन्यांत सर्व पात्र लाभार्थींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी.” विभागाकडून जिल्हास्तरावरही याबाबत विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याचे समजते.
हेही वाचा :
शेवग्याच्या शेंगांचं गिफ्ट, अजित पवारांनी हात जोडले अन् एकच हशा! म्हणाले, ‘बायकोला…’
आमदार राहुल आवाडे यांनी दिला गोरगरीब फेरिवाल्यांना दिलासा – दिवाळी बाजार पुन्हा सुरू!
सोने, चांदी आणि शेअर बाजारात गुंतवणूक कशी करावी?