सप्टेंबर महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत.(pocket) ऑक्टोबर महिना लवकरच सुरु होणार आहे. ऑक्टोबरमध्ये अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात बदलणाऱ्या नियमांमुळे थेट सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार आहे. एलपीजी गॅस ते पेन्शनच्या नियमांमध्ये बदल केले जाणार आहेत. यामुळे थेट महिन्याच्या बजेटवर परिणाम होणार आहे.

एलपीजी गॅसच्या किंमती
दर महिन्याच्या पहिल्या दिवशी एलपीजी गॅसच्या किंमतीत बदलतात. गेल्या अनेक महिन्यांपासून कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किंमतीत बदल झाले आहेत. घरगुती गॅसच्या किंमती अनेक दिवसांपासून स्थिर आहेत. त्यामुळे आता या महिन्यात गॅसच्या किंमती बदलणार की नाही हे पाहावं लागणार आहे.
ऑनलाइन तिकीटचे नियम
ऑक्टोबर महिन्यात रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.आता आरक्षण करण्यासाठी वेबसाइट सुरु झाल्यानंतर पहिल्या १५ मिनिटांत फक्त असे प्रवासी आरक्षण करु शकतात, ज्यांचे आधार व्हेरिफिकेशन झाले आहे.(pocket) १ ऑक्टोबरपासून हा नियम लागू होणार आहे.
पेन्शनच्या नियमांत बदल
आता एनपीएस, यूपीएस, अटल पेन्शन योजना आणि एनपीएस लाइटच्या नियमात बदल करण्यात आला आहे. पेन्शन रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथोरिटीने सेंट्रल रेकॉर्डकिपिंग एजन्सीकडून मिळणाऱ्या फीमध्ये बदल केला आहे. आता कर्मचाऱ्यांना PRAN उघडण्यासाठी E-PRAN किट १८ रुपये द्यावे लागणार आहे. तर फिजिकल PRAN कार्डसाठी ४० रुपये चार्ज द्यावा लागणार आहे.

यूपीआयच्या नियमांत बदल
आता ऑक्टोबर महिन्यात यूपीआयच्यादेखील नियमांत बदल केले जाणार आहेत. आता NPCI नवीन यूपीआय फीचर्समध्ये पीयर टू पीयर ट्रान्झॅक्शन बंद करण्याची शक्यता आहे. दरम्यान, फ्रॉड रोखण्यासाठी हा नवीन नियम लागू केला जाणार आहे.
बँकांना सुट्ट्या
ऑक्टोबर महिन्यात अनेक सण-उत्सव आहेत. त्यामुळे बँकांना अनेक दिवस सुट्ट्या असणार आहेत.(pocket) बँकांना २१ दिवस सुट्ट्या असणार आहे. यात दसरा, महात्मा गांधी जयंती आणि दिवाळीच्या सुट्ट्यांचा समावेश आहे.
हेही वाचा :
वर्दीतल्या सैतानाचं हादरवणारं कृत्य!
PhonePe, GPay आणि Paytm वापरकर्त्यांसाठी महत्वाची बातमी
YouTube वर आले जबरदस्त AI फीचर