देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर हे वेगवेगळे (Petrol)आहेत. प्रत्येक राज्यामध्ये पेट्रोलचा दर वेगवेगळा असण्याचे कारण काय आहे? प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.

इंधनाच्या दरामुळे देशातील नागरिक हैराण झाले आहेत. पेट्रोलचे दर 110 रुपयांपर्यंत वाढले असल्याने सर्वसामान्य जनतेला आर्थिक तंगीचा सामना करावा लागत आहे. तुम्हाला कदाचित(Petrol) माहिती नसेल की देशभरातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोलचे दर हे वेगवेगळे आहेत. राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 94.77 रुपयांना मिळते तर कोलकातामध्ये 105.41 रुपयांना मिळते. प्रत्येक राज्यामध्ये पेट्रोलचा दर वेगवेगळा असण्याचे कारण काय आहे? प्रश्नाचे उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत.
विशाखापट्टणममध्ये सर्वात जास्त तर दिल्लीत सर्वात कमी दर
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये सर्वात जास्त दराने पेट्रोल विकले जात आहे. येथे एक लिटर पेट्रोलची किंमत 109.04 प्रति लिटर आहे. तसेच हैदराबादमध्ये 107 रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल विकले जात आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर सर्वात कमी म्हणजे 94.77 रुपये प्रति लिटर आहे. तर दिल्लीत डिझेलची किंमत 87.62 रुपये प्रति लिटर आहे.
पेट्रोलच्या किमतींमागील कारण
तुमच्यापैकी अनेकांना वाटत असेल की पेट्रोल आणि डिझेलच्या किमती या आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीवर निश्चित केल्या जातात. मात्र असे नाही, भारतात प्रत्येक राज्य स्वतःचा व्हॅट, उत्पादन शुल्क आणि स्थानिक कर लादते, ज्यामुळे विविध राज्यांमध्ये इंधनाची किंमत वेगवेगळी असते. मे 2022 पासून केंद्र सरकारने आणि अनेक राज्यांनी कर कमी केले आहेत, मात्र त्यानंतरही इंधनाच्या दरात फारशी कपात झालेली नाही.
जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आणि परकीय चलन दर रोज सकाळी 6 वाजता जाहीर होतात. याचाही थोडाफार परिणाम इंधनाच्या दरावर होतो. मात्र स्थानिक करांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बदलांचा परिणाम कधीकधी उशिरा किंवा खूप कमी दिसून येतो. त्यामुळे इंधनाच्या दरात काही पैशांचा बदल होतो.
भारतात पेट्रोल महाग का आहे?
जगभरातील इंधनाच्या किंमती सतत बदललत असतात. इराणमध्ये पेट्रोल फक्त 2.4 प्रति लिटरने विकले जाते, तर हाँगकाँगमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 304 रुपये पर्यंत आहे. अमेरिकेतही, भारतापेक्षा पेट्रोल स्वस्त आहे; अमेरिकेत 80 रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल मिळते. ही रक्कम भारतातील सरासरी किमतीपेक्षा 21 रुपयांनी कमी आहे. भारतात पेट्रोल महाग असण्याचे सर्वात मोठे कारण हे कर रचना आहे.
वेगवेगळे कर
भारतात केंद्र आणि राज्य सरकार पेट्रोलवर उत्पादन शुल्क आणि व्हॅट सारखे महत्त्वपूर्ण कर लावतात. यामुळे जागतिक बाजारात कच्चे तेल स्वस्त झाले तरी इंधनाच्या किमतीवर फारसा परिणाम होत नाही. तसेच डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत झाल्यामुळे पेट्रोलच्या किमती वाढतात. तसेच पेट्रोल डीलर्सला देखील कमिशन द्यावे लागते, त्यामुळे भारतातील इंधनाच्या किंमती जास्त असतात.
हेही वाचा :
डोके शांत असेल तर हृदय देखील चांगले राहते,
राज्यावरील संकट कायम, या 10 जिल्ह्यांना थेट इशारा,
स्पर्धेतील संपूर्ण Match Fees सैन्य दल-पहलगाम हल्ल्यातील कुटुंबियांना,